You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

धारदार शस्त्र आणि लाकडी बॅटने पत्नी आणि मुलाची हत्या

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील घटना

राहुरी |(बद्रिश देहाडराय) –

Active न्युज टीम

आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात घडली आहे. घरघुती भांडणातून पत्नी आणि लहानग्या मुलावर धारदार शस्त्र आणि लाकडी बॅटने हल्ला करून निर्दयी बापाने खून केला आहे.

राहुरी तालुक्यातील बांबोरी येथील मोरेवस्तीवर राहणाऱ्या 30 वर्षीय भारत मोरे यांचे रविवारी पत्नी संध्या हिच्याशी दुपारी कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान, संतापलेल्या भारतने पत्नी संध्या आणि पाच वर्षाचा मुलगा साई यास लाकडी बॅटने जबर मारहाण केली. यात दोघांनाही आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आरोपीने विहरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान, ही दुर्देवी घटना घडली आहे. घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना खबर करताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे, सतीष शिरसाठ आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि हत्या करून शेतात लपून बसलेल्या आरोपी भारत मोरे यास ताब्यात घेतले. भारतच्या घरातील अन्य सदस्य लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले असताना हा प्रकार घडला आहे. मुलाची आणी पत्नीची हत्या भारतने का केली ?? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close