You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्तालाईफस्टाइलवाशिम

ग्रामिण भागात शेतीच्या कामासाठी पैसे देऊनही “जेसीबी’ मिळेना!

Active न्युज टीम

नवनाथ गुठे/ चोरद…

दिनांक…२२/०५/२०१९….

सध्याचे सम्रुधी महामार्गाचि कामे झपाट्याने सुरू असल्याने  कामे आपल्या भागात जोरात सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच शेतांमधील कामांना देखील सुरवात झाली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून “जेसीबी’ भाड्याने घेतली जात आहेत; परंतु या कामांसाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे देऊन देखील “जेसीबी’ भाडेतत्त्वावर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या भागातील अगदी जवळून गेलेला महत्त्व पुर्ण  सम्रुध्दी महामार्ग चे.काम सुद्धा झपाट्याने सुरू झाली आहे आणि अशावेळी बाजारपेठ  व तसेच ग्रामिण भागातील”जेसीबी’चालकांची चालती आहे, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.

पावसाळ्यापूर्वी शेतातातील कामांना देखील सुरवात झाली आहे. तसेच लहान खेडेगावांसह  नालेसफाईची व ईतर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी  वॉटरकप स्पर्धा सुरू असल्याने ही सर्व कामे करण्यासाठी “जेसीबी’ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही भागात सुमारे  जेसीबी मशीनची संख्या बर्याच प्रमाणात असून, प्रति तास काम करण्यासाठी “जेसीबी’चे भाडे हे 800 ते 900 रुपये इतके आकारले जात असते; परंतु सध्या सर्वत्र सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावी लागत असल्याने ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे पाऊस पडण्याआधी पूर्ण करण्यासाठी शासकीय कंत्राटदारासह शेतकरी अधिक पैसे देऊन देखील जेसीबी मिळत नसल्याची माहिती ग्रामिण विभागातिल शेतकरी बांधवांनी  दिली. आहे..

तातडीच्या कामांसाठी हजार रुपये तास 

बर्याच  प्रमाणात खोदाईची कामे देखील सुरू आहे. त्यामुळे “जेसीबी’ला मागणी असल्याने कामे त्वरित करण्यासाठी “जेसीबी’च्या मालकांकडून कामानुसार त्याच्याकडून प्रतितास हजार रुपये घेतले जात आहे.

“दिवस-रात्र’च्या कामांसाठी जास्तीचे पैसे

जिल्ह्यात सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ही कामे दिवसा व रात्रपाळी या दोन्ही शिप्टमध्ये सुरू आहे. यातच शासकीय कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिलेल्या असल्याने ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी कंत्राटदार ही कामे पूर्ण करण्यासाठी “जेसीबी’च्या साहाय्याने पूर्ण करत असल्याने त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.

असे आहेत “जेसीबी’चे दर

जेसीबी मालक शासकीय कंत्राटदारांची कामे करण्यासाठी त्यांच्याकडून 900 रुपये प्रतितास तर खासगी कामांसाठी 1000 ते 1100 रुपये प्रतितासाप्रमाणे वसूल केले जात आहे. तसेच “अर्जंट’ काम करण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या कामानुसार “जेसीबी’मालक हजार रुपये तास देखील घेत आहेत.

“जेसीबी’मुळे खोदाई किंवा इमारत पाडण्याचे काम काही तासांत पूर्ण होते. तसेच सध्या सर्वत्र कामांची रेलचेल सुरू असल्यामुळे “जेसीबी’ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. “अर्जंट’ कामांसाठी सुरू असलेले काम बंद करून दुसरे काम करावे लागते. त्यामुळे “सीझन’मध्ये जेसीबीचे भाडे अधिक असते. परंतु पावसाळ्यापुर्वी शेतकरी बांधव देखिल जेसीबी मशिनच्या साहाय्याने शेतातील बरेच कामे करण्यासाठी जास्त प्रमाणात मागणी करीत आहेत..कि जे सी बी मशीनच्या साहयाने शेतातील पाट,आणि.पाईपलाईन व ईतर खोदकाम कमि वेळातच होते .. – अमोल वामण कांबळे, “जेसीबी’ड्रायव्हर…चोरद..

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close