You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगाव

अखेर शिरपूर ग्रा.पं.ला मिळाला ग्राम विकास अधिकारी

भागवत भुरकाडे यांची शिरपूर ग्रा. प. चा पदभार स्वीकारला

शिरपूर दि. २२ मे (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरुण इंगळे हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये निलंबित झाल्यामुळे येथील पद रिक्त झाले होते ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे हे रुजू झाले आहेत. काल दिनांक २१ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

शिरपूर ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाते मागील काही महिन्यापासून शिरपूर ग्रामपंचायत मध्ये अनेक भ्रष्टाचार व अनियमितेच्या परस्पर तक्रारी झाल्याने जिल्हाभर शिरपूर ग्रामपंचायत चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती.

तत्कालीन सचिव यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्यामुळे व भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सदर पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त झाले होते. त्यामुळे नवनियुक्त ग्राम विकास अधिकारी भुरकाडे ग्रामपंचायत शिरपूर येथे नियुक्ती झाली आहे व पदभारसुद्धा त्यांनी स्वीकारला आहे. शिरपुर शहराला मानबिंदू उंचावण्यासाठी व सर्वांगीण विकास होण्यासाठी एक सक्षम अधिकारी मिळावा अशी  शहरवासीयांची मागणी होती. नवनियुक्त ग्राम विकास अधिकारी यांची नियुक्ती झाल्याने व भ्रष्ठाचारांच्या आरोप – प्रत्यारोपाने ढवळून निघालेल्या शिरपूरच्या विकासाचा गाडा ते कसे हाकतात हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close