You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइल

शिरपूर बस स्थानक परिसरात प्रवाशी निवाऱ्याचा अभाव

लहान मुले, स्त्रियांसह प्रवाशांचे हाल

(प्रतिनिधी: Active न्युज)

शिरपूर दि.१९ (प्रतिनिधी)

शिरपूर जैन हे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेले गांव असून परिसरातील १५ ते २० खेड्यांची बाजारपेठ असलेले गांव असल्या बरोबरच पर्यटन स्थळ सुद्धा आहे त्यामुळे शिरपूर येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते, परंतु शिरपूर येथे बस स्थानकावर प्रवाशांना थांबण्याकरिता प्रवाशी निवाराच नाही.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाचा पारा खूप जास्त वाढलेला आहे, तसेच लग्न सराई असल्याने फार मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचे निवाऱ्याअभावी हाल होत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हात ताटकळत उभे राहावे लागते.सोबत असणाऱ्या महिला व लहान मुलांना वाढत्या उन्हामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शिरपूर ग्रामपंचायत पंचायतच्या वतीने पूर्वीचा प्रवासी निवारा जीर्ण झाल्याने व रहदारीस अडथळा ठरत असल्याने मास्टर प्लान च्या अतिक्रमण हटावो कारवाई दरम्यान जमीनदोस्त केला. निवारा हटला रहदारीचा रस्ता फक्त काही दिवस मोकळा झाला,मात्र त्या जागेवर लघु व्यावसाईकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस होणारा अडथळा कायम आहे. समोर पावसाचे दिवस येणार आहेत. बस स्थानक परिसरात प्रवाशांना थांबण्याकरिता एखादा निवारा असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी प्रवाशांच्या या समस्येकडे लक्ष देऊन बसस्थानक परिसरात निवाऱ्या बांधला जावा अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close