You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममालेगाव

अल्पवयीन मुलगी बेपत्ता…..

शिरपूर पोलीस स्टेशन येथे अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल

शिरपूर : दि.२० मे (प्रतिनिधी)

(प्रतिनिधी: Active न्युज)

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रिसोड तालुक्यातील केशव नगर येथील अल्पवयीन मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाल्याने बेपत्ता मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस स्टेशनला १९ मे रोजी तक्रार दाखल केली. यावरून शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध  अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात केला

शिरपूर पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केशवनगर येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १८ ते१९ मे च्या रात्रीदरम्यान घरून काहीही न सांगता निघून गेली.आपल्या मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याच्या संशयावरून सदर मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भांदवी कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनात दामोदर इप्पर हे करीत आहेत.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close