You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल
कृषिवार्ताक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइलशिक्षण व नोकरी

वारसाची नोंद घेण्यास तलाठ्याची टाळाटाळ

तहसील कार्यालय आवारात महिला शेतकरी,पत्रकार आणि कायद्याविषयी वापरली अश्लील भाषा...

 

डोंगरकीन्ही येथील तलाठी राठी यांचा उद्धट व्यवहार

Active न्युज टीम

शिरपूर

ग्राम डोंगरकिनी येथील अल्पभूधारक महिला शेतकरी यांचे पती दुर्धर आजाराने मृत्यू झाल्याने पतीच्या नावे असलेली ८६ आर जमीन वारसाचे  नावे  नोंद घेण्यास डोंगरकीन्हीचे तलाठी मागील दोन महिन्यापासून टाळा टाळ  करीत असून तहसीलदार यांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. सदर महिलेने मा जिल्हाधिकारी ,उपविभागीय कार्यालय  वाशिम ,तहसीलदार मालेगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली असता दिनांक १४ मे रोजी तहसील कार्यालय येथे सदर तलाठ्याने शेतकरी,पत्रकार आणि कायद्याविषयी  अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केली. सोशल मेडीयावर सदर चित्रफित वायरल होत आहे. सर्वच स्तरातून आता या तालाठ्याविषयी राग व्यक्त केला जात असून त्याच्या निलंबनाची मागणी सुद्धा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अल्पभूधारक महिला शेतकरी विद्या विकासराव देशमुख रा डोंगरकिनी आपल्या पतीच्या नावे असलेली  ८६ आर शेत जमीन त्यांच्या वारसांच्या नावे नोंद घेण्यासाठी त्यांनी दि०१/०३/२०१९ रोजी तहसील कार्यालय मालेगाव येथे सर्व कागदपत्रासह रीतसर अर्ज दाखल केला होता  मा.नायब तहसीलदार यांनी दि.०१/०३/२०१९ रोजी अर्जदार विद्या विकास देशमुख डोंगरकीन्ही  यांचा तलाठी दप्तरी वारसाची नोंद घेणे बाबत अर्ज, वारसाचा चा दाखवा, मृत्यू दाखला, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्रास या कार्यालयास प्राप्त झाला आहे. अर्जदाराच्या मूळ  अर्ज सोबत संपूर्ण कागदपत्र यासोबत पाठविण्यात येत आहेत असे  तलाठी डोंगरकिन्ही  यांना आदेश दिला होता. दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी तलाठी  राठी  यांनी नोंद घेतली नसून मा तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. सदर अल्पभूधारक महिला शेतकरी पतीच्या आकस्मित मृत्यूने हतबल झाली आहे.  त्या  महिलेचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण झाले आहे. तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी त्या महिलेवर येऊन  ठेपली आहे. सदर तलाठ्याने जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर,व काहीतरी वाईट उद्देशाने नोंद घेण्यात टाळाटाळ केली आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वारसाची नोंद न झाल्यामुळे व खरीप हंगाम जवळ आल्याने बँक सुद्धा कर्ज देऊ शकत नाही त्यामुळे सदर महिला आर्थिक विवंचनेत सापडली आहे. सदर तलाठी डोंगरकिनी या  गावी येत नसून मालेगाव वरून कारभार पाहतात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता उद्घाटपनाची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे देतात असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  वारसची त्वरित नोंद घेण्यात यावी व दोन महिन्यापासून नोंद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अन्यथा मला न्याइक  मार्गाने  आमरण उपोषण करावे लागेल असे त्यांनी  बोलताना  सांगितले.

तसेच सदर तलाठ्ठ्याने तहसील कार्यालय परिसरात पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करीत खुले आवाहन केले कि, तुम्ही काहीही छापले तरी माझे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे सदर चित्रफित वायरल झाल्यानंतर महसूल प्रशासन सदर तलाठ्यावर काय कारवाई करते, कि आणखी शेतकऱ्यांची पिळवणूक व कायदा तसेच पत्रकारांना शिवीगाळ करायला सूट देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close