You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइल

शिरपूर जैन येथे नळाच्या पाण्यात आढळला नारू सदृश्य कृमी

5 कोटी रुपयाच्या पेयजल योजनेचा बोजवारा!

दूषित पाणीपुरवठयाने शिरपूर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिरपूर दि. १५ मे (प्रतिनिधी)

शेख सुलतान –

active news team

शिरपूर जैन येथील वार्ड नं. ५ मध्ये आज दिनांक १५ मे रोजी सकाळी शेख आसिफ यांच्या येथे ग्रामपंचायतच्या नळामध्ये जे पाणी आले होते. त्यामध्ये नारू सदृश्य कृमी आढळून आल्याने त्यांनी तो एका काचेच्या बाटलीत भरून प्रा.आ.केंद्र शिरपूर येथे नेला आरोग्य अधिकारी यांनी सदर बाटली घेऊन जिल्हा प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठवला आहे. सदर नारू किंवा जंतू सदृश जो कृमी आढळला त्यामुळे शिरपूर येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने नागरिकांत रोष आहे.

शिरपूर येथे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती ती दूर करण्यासाठी तत्कालीन जि. प. सदस्य यांनी पाच कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना  मंजूर करून घेतली व शिरपुर शहरांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली होती परंतु सदर योजना व्यवस्थित कार्यान्वित न झाल्यामुळे आजमितीला नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पाच वर्षांपूर्वी शिरपुर वासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे बोराळा येथील आडोळ लघुसिंचन प्रकल्पावरून शिरपुर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती परंतु त्यामध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत असत त्यामुळे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत असे येथील तत्कालीन जि. प. सदस्य यांनी ही समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल हे अपेक्षित होते. परंतु आज वास्तव वेगळेच असून शिरपुर वासियांना नियमित दूषित पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. आणि आज तर चक्क त्यामध्ये कृमी आढळून आला आहे.

जागोजागी पाईपलाईन लिकेज झाल्या आहेत , पाईप लाईन वर बसवलेले वॉलव्ह लिकेज झाले आहेत त्यामुळे नालीचे घन पाणी नळाच्या मार्फत नागरिकांमध्ये वितरीत होत आहे तसेच लिकेज मुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना मिळणारे दूषित पाणी जलसुरक्षका मार्फत आरोग्य विभाग व भूजल विभागाणे वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असते. पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणी करण्याची जबाबदारी शासनाने आरोग्य विभाग व भूजल विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने सदर विभागास तशा सूचना करणे, तसेच  पाणी शुद्ध करण्यासाठी जनजागृती करणे,व त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.

येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान त्यावेळच्या तत्कालीन विरोधी पक्षाच्या वतीने सदर योजनेचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या उपोषण व आंदोलन सुद्धा करण्यात आले होते शासनाच्या वतीने चौकशी करण्यात आली होती  सदर योजनेचे काम निकृष्ट झाल्याचे सर्वश्रुत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असताना चौकशी अहवाला मध्ये मात्र सदर योजनेचे काम योग्य झाल्याचे निष्पन्न झाले होते व त्यावेळी यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण ढवळून निघाले होते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आजही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचितच राहावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे राष्ट्रीय पेयजल योजना योग्य प्रकारे राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना शुद्ध ,स्वच्छ पाणी मिळेल अशी सर्वसामान्य नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया –

  • शेख असिफ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे आज दिनांक १५ मे रोजी सकाळी १० वाजता दरम्यान एक नारू, जंतू सदृश्य कृमी असलेली पाण्याची काचेची बाटली आणली होती ती आरोग्य केंद्रा मार्फत घेऊन जिल्हा प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठवली आहे. ३ ते ४ दिवसांमध्ये रिपोर्ट आल्या नंतर कळेल कि नेमका तो कृमी नारू आहे कि जंतू आहे. सध्या तरी काही सांगता येणार नाही. –       डॉ.करवते आरोग्य अधिकारी शिरपूर प्रा.आ.केंद्र
  • शिरपूर ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत जो पाण्याचा पुरवठा होतो त्यामध्ये अशा प्रकारे कुठलेही कीटक किंवा कृमी आढळणे शक्य नाही. रोज पाणी फिल्टर करून पाण्यात तुरटी व ब्लिचिंग पावडर नियमित टाकली जाते. तरी नागरिकांना आवाहन आहे कि जर कुठे पाईप लाईन लिकेज असेल, दुषित पाणी मिळत असेल तर ग्रा.पं.च्या निदर्शनात सदर प्रकार आणून द्यावा त्याची दक्षता घेण्यात येइल.- विजय अंभोरे अध्यक्ष राष्ट्रीय पेयजल योजना समिती शिरपूर ग्रा.पं.
पोलीस स्टेशन समोर लिकीज असलेली पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी मागील १५ दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा ज्यामध्ये जवळच असलेल्या नालीचे पाणी सुद्धा साचले आहे.
पोलीस स्टेशन समोर लीकीज व्हॉल्व मधून पाणी भरतांना लहान मुले
आरोग्य अधिकारी करवते यांना कृमी असलेली बाटली देतांना शेख आसिफ

फोटो कॅपशन

पोलीस स्टेशन समोर लीकीज व्हॉल्व मधून पाणी भरतांना लहान मुले, तर दुसऱ्या छाया चित्रात पोलीस स्टेशन समोर लिकीज असलेली पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी मागील १५ दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा ज्यामध्ये जवळच असलेल्या नालीचे पाणी सुद्धा साचले आहे.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close