You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
क्राईममहाराष्ट्र

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वाईन शॉप व्यवस्थापक ठार

चोरट्यांनी केले चार लाख रुपये लंपास

Story Highlights

  •  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. व तापासाच्या टिप्स पोलिसांना दिल्या आहेत.

प्रतिनिधी,अजय बोराडे

सिल्लोड-Active न्युज टीम

सिल्लोड शहरातील वाईन शॉप दुकान बंद करून दुचाकीवर घराकडे रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यवस्थापकासह दोघांना अडवून दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये व्यवस्थापक ठार झाले आहे  तर मोटारसायकल वरील त्यांचा दुसरा सहकारी गभींर जखमी झाला आहे. त्यानंतर त्यांच्या जवळील चार लाख रुपयाची रक्कम असलेली पिशवी दरोडेखोरांनी पळविली आहे. ही फिल्मी स्टाईल घटना शहरातील भराडी रस्त्यावर असलेल्या जयभवानी नगरात रविवारी(दि.12)रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे.

भिकन निळोबा जाधव (वय 45 रा. मोढा, ता. सिल्लोड)असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यस्थापकाचे नाव आहे. तर या हल्ल्यात लक्ष्मण पुंजाजी मोरे(वय 32 रा मोढा हल्ली मुक्क्म जयभावानी नगर सिल्लोड)असे गंभीर  जखमी झालेल्या सहकाऱ्याचा समावेश आहे. त्याच्यावर रात्री सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून औरंगाबादला हलविण्यात आहे. या घटनेची माहिती अशी की, सिल्लोड शहरात भराडी वाईन शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानात भिकन जाधव व लक्ष्मण मोरे हे कर्मचारी आहे. रविवारी आठवडे च्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री दहा वाजेच्या सुमाराला दुकान बंद केले. व्यवसायाची जमा झालेली रोकड रोजमेळ जुळवून त्यांनी पिशवीत भरली. व ते घराकडे निघाले. मोरे दुचाकी चालवीत होते तर जाधव मागे बसले होते.मोरे यांना जयभावानी नगरात सोडुन आपल्या मोढा गावी जाणार होते.ते दुचाकीवर जयभावानी नगारा जवळ पोहचले त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी  अंधाराचा फायदा घेऊन त्यांची दुचाकी आडविली आरोपींनी आपली दुचाकी त्यांच्या दुचाकीला आडवी लावुन काही कळण्याच्या आत मोरे व जाधव यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांनी त्यांच्याजवळील पैशाची पिशवी घेऊन फरार झाले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले असतांना परिसरातील एकाने ही घटना पहिली. त्यानंतर तातडीने ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने शहरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले. जखमींना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भिकन जाधव यांना मृत घोषित केले. मोरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून घाईने त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान या हल्ल्यात मृत झालेल्या भिकन जाधव व यांच्या नातेवाईकांनी व मोढा येथील ग्रामस्थानी जो पर्यत आरोपींना अटक होणार नाही. तो पर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.शेकडो जण पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन बसले होते. माणसाचे शुल्कक पैशा वरून मुडदे पडत असतांना पोलीस काय करीत होते असा संतप्त सवाल उपस्थित करीत होते.

त्यांतरही संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी व मोढ्याच्या ग्रामस्थानी सोमवारी(दी.13)रोजी शहरातील आंबेडकर चौकात आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे जळगांव-औरंगाबाद  महामार्गावर बससह अन्य शेकडो वाहने अडकून पडली. यामुळे वाढत्या उन्हात प्रवाशासह वाहन चालकांची परवड झाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी आंदोलन स्थळी येऊन आरोपीना पाच दिवसात अटक करू असे आश्वासन दिल्याने अंदोलन मागे घेण्यात आले.

  या प्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु असून यातुन या प्रकरणातील  आरोपी पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीच्या शोधासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहे. पाच दिवसात आरोपी पकडून मृताच्या नातेवाईकांना न्याय दिला जाईल  –  सुदर्शन मुंढे,उपविभागीय पोलीस अधिकारी,सिल्लोड

यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पाच पथके नेमण्यात आली आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी दिली. दरम्यान जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

मृत भिक्कन निळोबा जाधव (50 रा. मोढा ता. सिल्लोड) व जखमी लक्ष्मण पुंजाजी मोरे (35 रा. मोढा, ह. मु. जय भवानी नगर, सिल्लोड) हे दोघे शहरातील भराडी वाईन शॉपवर कामाला आहेत. रविवारी आठवडी बाजारच्या दिवशी नेहमी प्रमाणे त्यांनी रात्री दहा वाजेच्या सुमाराला दुकान बंद केले. व्यवसायाची जमा झालेली रोकड रोजमेळ जुळवून त्यांनी पिशवीत भरली व ते घराकडे निघाले. मोरे दुचाकी चालवीत होते तर जाधव मागे बसले होते. मोरे यांना जयभावानी नगरात सोडुन जाधव आपल्या मोढा गावी जाणार होते. ते दुचाकीवर जयभावानी नगराजवळ पोहचले. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी अंधाराचा फायदा घेत त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आत मोरे व जाधव यांच्यावर चाकूने सपासप वार केले व त्यांच्याजवळील पैशाची पिशवी घेऊन पसार झाले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेले असतांना परिसरातील एकाने ही घटना पहिली. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने शहरात नाकाबंदी केली. मात्र चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भिकन जाधव यांना मृत घोषित केले, तर मोरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सोमवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतप्त नातेवाईक, गावकऱ्यांचा दीड तास रास्ता रोको

मृत भिक्कन जाधव यांच्यावर सोमवारी सकाळी श्वविच्छेदन करण्यात आले. परंतु त्यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी जो पर्यंत आरोपीला पकडत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत  शहरातील डॉ. आंबेडकर चौकात दीड तास रास्ता रोको केला. सुदर्शन मुंढे, राजेंद्र बोकडे यांनी आंदोलन स्थळी येऊन आरोपींना पाच दिवसात अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी ठप्प वाहतूक सुरळीत केली.

अप्पर पोलिस अधीक्षक ठान मांडून

सोमवारी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांनी  घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी  मोक्षदा पाटील यांनी पोलिसांना तपासाच्या टिप्स ही दिल्या. शिवाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गणेश गावडे शहरात ठान मांडून आहेत.

जखमी लक्ष्मण पुंजाजी मोरे
संतप्त नातेवाईक, गावकऱ्यांचा दीड तास रास्ता रोको
जळगांव-औरंगाबाद महामार्गावर बससह अन्य शेकडो वाहने अडकून पडली

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close