You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्रमालेगाव

ग्रामपंचायत शिरपूर भ्रष्टाचार्ऱ्यांचे माहेरघर ?

आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला कायम

ग्रामपंचायत शिरपूर मध्ये असे किती? भ्रष्टाचार झालेत गावकरी संभ्रमात

शिरपूर दि.०७ मे (प्रतीनिधी)

(प्रतिनिधी: Active न्युज)

शिरपूर येथील सन २०१५/१६ मधील तत्कालीन सरपंच/सचिव यांनी (रिपेयर टू व्हिलेज वॉटर स्कीम) चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत गौळखेड(शिरपूर वार्ड नं.१) येथे १७ लाख रुपयांचे काम करण्यात आले होते. सदर कामांमध्ये प्रचंड अनियमितता भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या कामाची निविदा चुकीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तत्कालीन सरपंच सचिव यांनी हेतू पुरस्सर पणे शासनाच्या निधीचा गैरवापर केला असून सदर निधीचा भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियमाचा भंग केला असल्याची तक्रार सरपंच सुनीता अंभोरे व विजय आंभोरे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे दिनांक २८/०३/२०१९ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे शहरांमध्ये ग्रामपंचायत पंचायत मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या चर्चांना उत आला आहे.

सन २०१५/१६ मध्ये (रिपेयर टू व्हिलेज वॉटर स्कीम)१४ व्या वित्तायोगा अंतर्गत तत्कालीन सरपंच इंदुताई इरतकर व सचिव  काळबांडे (सदर सचिव लाचेची रक्कम स्वीकारतांना अटक झालेली आहे) यांच्या कार्यकाळामध्ये १७ लाख १हजार ९५५रुपयाचे काम करण्यात आले आहे. सदर कामाची ई-निविदा शासनाचे ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध न करता चुकीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे शासनाच्या नियमांचा भंग झाला असून शासनाची फसवणूक करून भ्रष्टाचार केला आहे. शासन निर्णय दिनांक २६/ ११ /२०१४ नुसार कोणतीही इ – निविदा  (www.mahatenders.gov.in) व (www.maharashtra.etenders.in) या दोनच संकेतस्थळावर प्रसिद्ध करता येते इतर कोणत्याही संकेतस्थळावर इ -निविदा प्रसिद्ध करता येत नाही. सदर तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायतच्या निधीच्या गैरवापर करण्यासाठी व भ्रष्टाचार करण्यासाठी चुकीच्या संकेतस्थळाचा वापर करण्यात आला आहे  असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर इ -निविदा कुणालाही माहीत होऊ नये व स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदारास काम घेता यावे. त्यामध्ये प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचार करण्यासाठीच  तत्कालीन सरपंच/सचिव यांनी हा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, शासनाची फसवणूक केली आहे व त्यामध्ये अनियमितता करून भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे तत्कालीन सरपंच व  आज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना मुंबई  ग्राम पंचायत अधिनियम चे कलाम ३९ (१) नुसार सदस्य पदावरून तात्काळ  अपात्र घोषित करण्यात यावे. तसेच तत्कालीन सचिव काळबांडे यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करण्यात यावे. तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना याबाबत अहवाल मागवण्यात यावा व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर तक्रारी द्वारे करण्यात आली आहे.

शिरपूर ग्रामपंचायत मध्ये वारंवार आजी व माजी पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे सर्वच पदाधिकारी एकाच माळेचे मनी आहेत अशी गावकऱ्यांची धारणा होत आहे. कुणालाहि गावाचे, गावकऱ्यांचे देणे घेणे नसून सर्वांना आपलेच खिसे भरण्याची घाई झालेली आहे असे या वारंवार होणाऱ्या आरोप व तक्रारींवरून दिसून येत आहे.

 आरोप आणि प्रत्यारोप, चौकशी कारवाई या सर्वांमध्ये शिरपूरचे राजकारण ढवळून निघत आहे. याचा परिणाम विकास कामावर होत असून शिरपूर विकास आराखडा तयार झाला कि नाही हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेल्या आदेशाचे अतिक्रमणाबाबत व विकास आराखड्याबाबत तंतोतंत पालन झाले कि नाही हे सुद्धा सर्व सामान्य जनतेला दिसून येत नाही. एकंदरीत शिरपूर ग्रामपंचायतची परिस्थिती बघता शिरपूर ग्रामपंचायत मध्ये झालेली अनियमितता लक्षात घेऊन ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमाने गरजेचे आहे. असे गावकऱ्यांना गरजेचे वाटत आहे.

 

ई-निविदा काढणे ही प्रशासकीय बाब असून सदर कामे ग्रामसेवक करतात निलंबित सचिव अरुण इंगळे व विध्यमान सरपंच सौ.सुनिता अंभोरे याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप चौकशी अहवालामध्ये सिद्ध झाल्याने सदर खोटे आरोप करण्यात येत आहेत.

सौ. इंदूताई इरतकर मा.सरपंच शिरपूर

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close