You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावव्हीडीओ

ब्रेकिंग… जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी तिजोरीसह तब्बल १४ लाख ९१हजार रक्कम केली लंपास

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किन्हीराजा येथील घटना

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=uPK3m_Er9Jk[/embedyt]

व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक क्लिक करा .

 

Active न्युज टीम

शेख सुलतान –

मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कीन्हीराजा येथील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शुक्रवार दि.०३ मेच्या राञी चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल १४ लाख ९१हजार रुपयाची रक्कम चोरांनी लंपास केली.बँकेत सी.सी.टी.व्ही. नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ग्यास कटरच्या सहाय्याने कट करून चोरट्यांनी चक्क तीजोरीसुद्धा उचलून नेली.सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून. चोरीच्या रात्रीच्या वेळी बँकेचा सुरक्षा कर्मचारी काय करीत होता ? बँकेत एवढी रोकड असतांना बँक सुरक्षा एवढी तकलादू का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर बँक परिसरात सि.सी.टी.व्ही. नव्हती हे विशेष. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. घटना स्थळी वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय कुमार चव्हाण दाखल झाले असून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे पुढील तपास सुरु आहे.

आमचे प्रतिनिधी घटना स्थळाला भेट देत असून लवकरच सविस्तर बातमी आपणा पर्यंत पोहोचवली जाईल.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close