You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरूळपीर शाखा वनोजा कडुन पक्ष्यांसाठी जलपात्र वितरण

आदित्य इंगोले –

Active न्युज

तापमान थेट ४८ ° अंशावर जाऊन पोहचले. कडक उन्हाचा जबरदस्त फटका मुक्या जीवांना वन्यप्राण्यांना बसत आहे. कित्येक पक्षी आज पाण्याअभावी मरण पावत आहे. थेंबभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करित आहेत. वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा देखील मृत्यू होत आहे.तसेच वाढत्या उन्हामुळे पशु पक्ष्यांना उष्माघात चा धोका संभवतो. अशा परिस्थितीत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. हिच परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र गौरव कुमार इंगळे ह्यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात तब्बल २००० मातीचे जलपात्र वितरणाचे कार्य वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरूळपीर व विविध शाखांचे सदस्य करित आहेत. वनोजा शाखेने सुध्दा ठिकठिकाणी शेकडो जलपात्रांचे वितरण केले. नुसत वाशिम जिल्ह्यात च नव्हे तर अकोला जिल्ह्यात जाऊन सुध्दा जलपात्रांचे वितरण केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीटाकळी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अकोला व अकोला येथील स्थानिक नागरिकांना देखील जलपात्रांचे वितरण केले. आज वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरूळपीर शाखा वनोजा कडुन शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालय येथे टिम च्या सदस्यांनी जलपात्रांचे वितरण केले. यावेळी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशचंद्रजी कर्नावट साहेब यांच्या हस्ते सदर जलपात्र झाडावर बांधून त्यामध्ये पाणी टाकण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी सुध्दा झाडांवर जलपात्र बांधून त्यामध्ये पाणी टाकले. सदर उपक्रमासाठी वानखडे सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरूळपीर शाखा वनोजा अमर खडसे, ओम टोंचर, वैभव गावंडे, व आदित्य इंगोले यांची उपस्थिती होती. तसेच विद्यालयातील कराळे सर, गीर्हे सर, सुर्वे सर, अपूर्वा सर, वानखडे सर व मुख्याध्यापक व इतर कर्मचारी हजर होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close