You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

पाण्याचे टँकर दोन महिन्यापासून बंद

तालुक्यातील भवन,माळवाडी येथील नागरिकांना तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे

अजय बोराडे:

Active न्युज

सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यातील भवन येथील माळवाडी येथील पाण्याचे टँकर दोन महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांना तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी तात्काळ टँकर सुरु करण्यात यावे नसता जनावरासह भवन ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा माळवाडी येथील नागरिकांनी निवेदनाव्दारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे.

भवन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माळवाडी येथील पाण्याचे टँकर दोन महिन्यापासून बंद आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींनी ही तळ गाठल्याने भांडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन- चार कि. मी. पायपीट करावी लागत आहे. या संधर्भात ग्रामपंचायत कार्यालयात मागणी करुण ही टँकर सुरु करण्यात आलेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर नाना कळम, बाबुराव कांबळे, सांडू कळम, संभाजी कळम, संजय कळम, श्रींरंग कळम, हिम्मत कळम, विलास कळम, एस फूके, सुखदेव कांबळे, एकनाथ कांबळे आदींच्या सह्या आहेत.

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close