You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री

गुटखा माफीयाजवळ लाखोंचा साठा; अधिकार्यांरचे उदासिन धोरण जनतेसाठी घातक

प्रतिनिधी/रिसोड
रिसोड शहरात गुटखा विक्री चालू आहे. ज्या गुटख्यामुळे मुखाचा व घशाचा कर्करोग होतो. हे अनेक वेळा सिध्द झाले आहे. याकडे लक्ष देत राज्यशासनाने महाराष्ट्रात गुटखा व तंबाखू जन्य पदार्थावर बंदी घातली आहे. परंतु रिसोड येथे काही व्यापारी छुप्या मार्गाने गुटख्याची विक्री करीत आहे. हे व्यापारी पोलिस विभागाला ठेंगा दाखवत राजरोसपणे सितार, विमल, नजर या नावाच्या पुड्या बाजारात विकत आहेत. यामध्ये कोट्यवधीची उलाढाल होत असून तरूण पिढी मात्र व्यसनाधिन होत चालली आहे.
तंबाखू जन्य पदार्थाच्या आधिन होवून युवक वर्ग कर्क रोगाला बळी पडत आहे. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातल्यानंतर शासनाचा अन्न व औषध प्रशासन विभाग हा कर्त्यव्य दक्ष होत सुरूवातीला एक -दोन कारवाई केली. आज घडली मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी फक्त हप्ते घेण्यापूर्तचे कार्य करीत असल्याचे दिसत आहे.
पोलिस विभागाकडून अनेक वेळा धाडशी कारवाया झाल्या मात्र पोलिसांना पाहिजे तसे अधिकार नसल्याने गुटखा पकडल्यानंतर अन्न व प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येतो अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिलेल्या गुटख्या मालाची काय झाले व काय होते हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे.
रिसोड शहरातील गुटखा माफीया या व्यवसायातून लाखोची उलाढाल करून शहरातील व तालुक्यातील तरूणाई देशोधडीला लावत आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याने गुटखा व्यवसायीकांचे अधिकारी वर्गासोबत साठेलोटे असल्याचे दुधपिणारे बाळही सांगू शकते. शहरात छुप्या मार्गाने गुटखा दररोज येत असतो. तोच गुटखा रात्रीच्या वेळी संबंधित लघुव्यवसायीक यांना पोच करण्यात येतो. यावेळी पोलिस प्रशासनाच्या पेट्रोलींग करणार्‍या वाहनामधून कर्तव्य पार पाडत असलेले अधिकारी व कर्मचारी उघड्या डोळ्याने बघत असतात. मात्र कारवाई होत नाही. यामागे काय कारण असेल हे सर्वसामान्यांना सांगण्याची गरज नाही. हे सर्व जनता ओळखून आहे.

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close