You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगावरिसोड

विहिरीत पडलेल्या ३ रोहींना दिले जीवनदान

शिरपूर / प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या ग्राम वाघी(खुर्द)येथील शेख दादूमिया यांच्या शेतातील विहिरीतील ही घटना. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पशु ,पक्षी प्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहे. अशातच पाण्याच्या शोधार्थ ३ रोही शेतातील विहिरीत पडल्याची घटना २८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता वाघी खुर्द शेत शिवारात घडली .रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथील शेख दादुमिया यांच्या शेतातील विहीरीत पाण्याच्या शोधात असलेले ३ रोही विहिरीत पडले.दादुभाई यांनी सदर घटनेची माहिती गावकर्‍यांना दिली.गावकर्‍यांनी रोहिला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण यश येत नसल्याने.पोलीस पाटील यांनी भ्रमणध्वनीवरुन वनविभागाला माहिती दिली. वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.रात्रीच्या अंधारात रोहिना बाहेर काढणे शक्य नसल्याने वनविभागाने दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता ऑपरेशन सुरू केले. ३ वनमजुरांनी विहिरीत उतरून दोरीच्या साह्याने ३ रोहिना बाहेर काढण्यात यश मिळविले. सदर ऑपरेशन वनरक्षक एस. एल. शिंदे, वनरक्षक सुनील फुलसांवगे वनमजुर आणि पोलिस पाटील शेख शगीर ,उपसरपंच सुधाकर मोरे, अंबादास खरात खरात,संदीप सरोदे, शेख दादुभाई आदींनी राबविले.

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close