You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी अशा करा उपाययोजना

(प्रतिनिधी: Active न्युज)

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सचिद्र सुती कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. जर आपण बाहेर उन्हात काम करत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्य़ांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा. जर शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी तसेच सतत जर घाम येणे हे उन्हाचा झटका बसण्याचे चिन्ह आहेत व जर चक्कर येत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. आपले घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावी. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. कामगारांनी सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. जास्तीत जास्त कामे हे पहाटेच्या वेळी करून घ्यावेत. बाहेर कामकाज करीत असणार्‍यांनी मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर व आजारी असणार्‍यांची अधिकची काळजी घेण्यात यावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवु नये. दुपारी १२ ते ३.३0 वा. या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३.३० वा. या वेळेत बाहेर तापमाण जास्त असल्यास शारिरीक र्शमाची कामे करण्याचे टाळावीत. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी, अशा उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत सुचविण्यात आल्या आहेत.

 

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close