You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांचे ‘अच्छे दिन’ कधी?

शिरपूर : दि. २६(प्रतिनिधी)

 

‘सशक्त बालक..सक्षम भारत’ हे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना अद्यापही कागदावरच आहे. मागील कित्येक महिन्यांपासून नोंदणी केल्यानंतरही स्थानिक गर्भवती व बाळंत लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या  योजनेच्या लाभार्थ्यांचे ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

 

महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.बालकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, कुपोषणाची समस्या थांबावी या उद्देशाने ही योजना राबविल्या जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामधे गर्भवती महिलेची नोंद करणे आवश्यक असते.आशा सेविकेमार्फत सदर योजनेचे अनेक प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये राधिका विशाल तायडे, पुनम प्रदीप सेंगर,शुभांगी गोविंदा चव्हाण,वैशाली उमेश देशमुख, भारती विनोदराव तायडे व अशा अनेक प्रस्ताव दाखल करुन कित्येक महिने लोटले आहेत. परंतु अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित असल्याने लाभार्थी अच्छे दिनच्या प्रतिक्षेत आहेत.ग्रामीण भागांमध्ये आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने स्त्रियांना सुद्धा कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा लागतो. त्यासाठी त्यांना रोजंदारीने काम करावे लागते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांना पुरेसा आरामही मिळत नाही. चारितार्थ कसा भागवायचा ?अशा अनेक विवंचनेला तिला सामोरे जावे लागते.सदर योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.त्यामध्ये पहिला हप्ता १ हजार रूपये गर्भवती मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता २ हजार रुपये बाळांत पूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यानंतर आणि शेवटचा हप्ता २ हजार रुपये स्त्री प्रसूत झाल्यानंतर मिळणे अपेक्षित असते. तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत १ हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक रक्कम मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण ६ हजार रुपये रक्कम गर्भवती -स्तनदा स्त्रीला मिळायला हवी.

 

परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाकडून सदर  योजनेला हरताळ  फसल्या जात आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर शासनाने दिलेली आहे तीच यंत्रणा जाणीवपूर्वक कसूर करत असल्याचे लाभार्थींच्या वतीने बोलले जात आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभार्थी रक्कम त्वरीत जमा करण्यात यावी अशी लाभार्थ्यांच्या वतीने मागणी होत आहे.

 

 प्रतिक्रिया
सदर योजनेमध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लाभार्थी रक्कम जमा झालेली नाही आधार कार्ड मॅच झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील
 संतोष बोरसे
तालुका वैद्यकीय अधिकारी मालेगाव
 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अशा सेविका यांच्यामार्फत सर्व कागदपत्रांची मी पूर्तता केलेली आहे आज माझी मुलगी सात महिन्यांची झाली आहे तरीसुद्धा माझ्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत मी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर तसेच तालुका डी. एच. ओ वाशिम  यांच्याकडे याबाबत विचारणा केली आहे परंतु सर्वच यंत्रणा  उडवाउडवीचे उत्तरे देत आहे त्यामुळे सदर योजनेपासून आम्ही वंचित आहे
शहा-  लाभार्थीचा पती शिरपूर

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close