You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

निवासी अतिक्रमण नियमाकुल करतांना भेदभाव झाल्याचा आरोप

शिरपूर जैन येथील २ माजी सरपंचांनी केली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

शिरपूर : दि.२७ (प्रतिनिधी)

शिरपूर जैन येथील २ माजी सरपंच यांनी दिनांक २५ एप्रिल २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल केली की, ग्रामपंचायत शिरपूर येथे २०११ पूर्वीपासून निवासी अतिक्रमण झालेले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे गावातील नियमात बसणारी सर्व अतिक्रमणे नियमाकुल होणे अपेक्षीत होते. परंतु पाचशेपेक्षा जास्त अतिक्रमण धारकांची यादी तयार करून त्यांच्याकडून लाखो रुपयाची कर वसुली सुद्धा केली. परंतु सरपंच व सचिव यांनी त्यांच्या मर्जीतील फक्त ८२ लोकांची नावे नियमाकुल करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे. उर्वरित नियमात बसलेले प्रपत्र अनुसार (हरकती नावे वगळून) ३११ अतिक्रमण धारकांची नवे हि  ग्रामपंचायतीने हेतूपुरस्पर नियमात बसत असून सुद्धा नियामाकुल करण्यासाठी पाठविण्यात आलेली नाहीत तसेच ऑनलाइन प्रपत्र मध्ये क्रमांक ११६ हे ई. एन.सी. ४९९६१५ हे संजय कोठारी यांच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार असून सुद्धा सरपंचाच्या नातेवाईकाची असल्यामुळे नियमानुकूल करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे. सदर अतिक्रमण हे मुख्य रस्त्याजवळ असल्यामुळे त्वरित काढण्यात यावे. अशी मागणी सदस्यांनी यापूर्वीसुद्धा केलेली आहे. निवेदनात पुढे नमूद केले आहे की, वरील नियमाप्रमाणे नियमात बसत असलेल्या गावातील सर्व अतिक्रमणधारकांना नियमाकुल करण्यासाठी कार्यवाही करावी व वंचित ठेवणाऱ्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच शिरपूर ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी देण्यात यावा. कारण सध्या असलेले ग्राम सेवक हे त्यांच्या कडे जास्त गावांचा चार्ज असल्याचे कारण सांगत कार्यालयात अनुपस्थित असतात. तसेच त्याचे वर भ्रष्टाचाराचे आरोप असून चौकशी सुरु आहे.आणि शिरपूर ग्रामपंचायत ला वि.डी.ओ. दर्जाचे पद असल्याने लवकरात लवकर नवीन ग्राम सेवक देण्यात यावा (सदर निवेदन दिल्यानंतर दुसऱ्यादिवशी आधीच्या काही प्रकरणामुळे ग्राम सेवकाचे निलंबन दिनांक २६ एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशीम यांचे कडून करण्यात आलेले आहे.) अशा प्रकारची मागणी सदर निवेदनातून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया-
                सदर बाब प्रशासकीय असल्याने ग्रा.प.सचीवा द्वारे प्रत्यक्ष स्थळ दर्शक पाहणी करून नियमात बसणाऱ्या अतिक्रमण धारकांची यादी वेबसाईटवर उपलोड केली. काम सुरु असतांना वेबसाईट वर लोडवाढल्याने काही अतिक्रमण धारकांची माहिती अपलोड करणे शक्य झाले नाही. वेबसाईट पुन्हा सुरु झाल्यावर नियमात बसणाऱ्या सर्व अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव पाठविले जातील. कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही.
सरपंच – सौ.सुनिता अंभोरे
Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close