प्रदिप सावले
(प्रतिनिधी: Active न्युज)
मालेगाव: शहरात आयपीएल क्रिकेटवर क्रिकेटशौकीन च्या वतीने मालेगाव तालुक्यासह शहरांमध्ये करोडो रुपयाचा सट्टा लावण्या जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे .
मालेगाव तालुक्यासह शहरातील सट्टा घेणाऱ्यांनी कडे शहरातील काही सट्टा शोकिंग सट्टा लावतात दरम्यान या प्रकारामुळे तरुण पिढी वाईट मार्गावर जाण्याची दाट शक्यता आहे आयपीएल क्रिकेट 23 मार्च पासून सुरू झाले आहे क्रिकेट खेळाची क्रेज तरुण वर्गासह आबालवृद्धांसह वाढत चालली आहे तालुक्यासह शहरात क्रिकेटवर सट्टा लावणे सुरू आहे क्रिकेट शौकीन सट्टा लावण्याकरता काही जणांना हाताशी धरून सट्टा घेणाऱ्यानकडे सट्टा लावत आहेत तो सट्टा मालेगावातील मेन सट्टाघेणार्या कडे जात असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे दररोज करोडो रुपयांची उलाढाल मालेगाव तालुक्यात होतअसल्याचे बोलले जात आहे . क्रिकेट शौकिनांचा क्रिकेटचा खेळाचा आनंद घ्यायच्या ऐवजी या आसत्याच्या प्रकारामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे याकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे तालुक्यात या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत अशा स्थितीत नुकताच सुरू झालेला आयपीएल क्रिकेटचा सट्टा बाजार चांगला तेजीत असल्याची चर्चा सर्वत्र आहे आयपीएल क्रिकेट हा 23 मार्च पासून सुरू झाले असून टॉस कोण जिंकतो कोणता संघ जिंकणार कोण किती रन काढतो यावर करोडो रुपयांचा सट्टा तालुक्यासह शहरात येथील सट्टे बहाद्दर कडे लावल्या जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे
या सट्टाबाजार वेळीच नियंत्रण आणण्याची गरज आहे यामुळे तरुणाई वाईट मार्गाला लागत असल्याचे बोलले जात आहे.( शहर प्रतीनिधि ) प्रदिप सावले