You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशलाईफस्टाइल

जालना लोकसभा मतदानासाठी प्रशासन सज्ज

अजय बोराडे सिल्लोड,

प्रतिनिधी : Active न्युज

: जालना लोकसभा मतदार संघात 23 एप्रिला घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून सिल्लोड – सोयगाव मतदार संघात 356 मतदान केंद्रांवर 3 लाख 17 हजार 216 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात 1 लाख 69 हजार 46 पुरुष, तर 1 लाख 48 हजार 170 महिला मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून सोमवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची सर्व साहित्यासह  मतदान केंद्रांवर रवानगी करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाच्या 34 बसेस बुक करण्यात आलेल्या आहे. मतदान केंद्रांवर भेटी देण्यासाठी तसेच नजर ठेवण्यासाठी झोनल अधिकारी व इतर अधिकाऱ्यांसाठी 75 जीप (वाहने) राहणार आहेत. यात 11 जीप राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. 356 केंद्रांवर 1 हजार 612 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून मतदान केंद्रांवर प्रथमच पिण्याचे पाणी, रॅम्प, व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय नगरपालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग व वृध्दांसाठी रिक्षांची व्यवस्था राहणार आहे. 

        या मतदार संघात 9 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या केंद्रांवर क्षेत्रीय अधिकारी, फिरते पथक व पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. मतदार संघात 10 केंद्रांवर 1 हजार 400 पेक्षा अधिक मतदार असल्याने या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पांडूरंग कुलकर्णी, रामेश्वर गोरे यांनी केले आहे.

        या निवडणुकीत शहरात दोन सखी मतदान केंद्रे राहणार आहे. या मतदान केंद्रांची सर्व जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे राहणार आहे. शहरातील रामकृष्ण विद्यालय व जोहर उर्दू शाळेत ही मतदान केंद्रे राहणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.   

     मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 600 पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. यात 6 पोलिस निरीक्षक, 62 सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, 40 कर्मचाऱ्यांची एक राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी व केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. शिवाय संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी दिली. 

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close