You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

“वोट इंडिया वोट’, “मतदानाचा अधिकार देई लोकशाहीला आधार’

(प्रतिनिधी: Active न्युज)

सिल्लोड- “वोट इंडिया वोट’, “मतदानाचा अधिकार देई लोकशाहीला आधार’, “मत द्यायला जायचे आहे आपले कर्तव्य बजावायचे आहे’, “देशाचा मतदार युवा घडवी विकास नवा’ अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर, पथनाट्यातून साद घालणारे 14-15 तरुण तरुणी पथनाट्य संपल्यावर कोण-कोण करणार मतदान या प्रश्नाला हात उंचावून उत्तर देणारे हात, असे चित्र सिल्लोडभर दिसले.

भारत निवडणूक आयोग, तहसील कार्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित मतदान जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे पथनाट्य सिल्लोड विधानसभा अंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. वोट इंडिया वोट व युवा भारत ग्रूपच्या वतीने  उपविभागीय अधिकारी श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्या प्रेरणेने , नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ उमेश राजहंस, प्रा. रुपेश ठाकूर यांच्या परिश्रम व  मार्गदर्शनाखाली कलाकार व नाट्यशास्र विभागाचे विद्यार्थी ईश्वर मोरे,शरद काकडे, पूजा तायडे, पंकज सावंत, संदीप काकडे, तेजस्विनी वानखेडे, सुनंदा मोरे, अमोल गाडेकर,रुपाली नवले, पायल गायकवाड, दिनेश मेथे, अमीन शाह यासीन शाह, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यांनी जिल्हाभर पथनाट्य सादर केली. या पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शन, संगीत व वेशभूषा अमोल बागूल यांनी केले. तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी पथनाट्याचे कौतुक केले. या पथनाट्यामध्ये मतदानाचे महत्त्व, निवडणूक ओळखपत्राची प्रक्रिया, मतदान जागृतीची गाणी, कविता, घोषवाक्य, मतदानाची प्रतिज्ञा व संविधानाचे वाचन या व इतर घटकांचा समावेश होता. ही पथनाट्ये पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पथनाट्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी होणारी पथनाट्ये पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहे मतदानाची काळी शाई ही मध्यवर्ती कल्पना घेऊन मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश समर्पक पद्धतीने देण्यात आला आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 8308444934  –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close