You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगाव

शिरपूर जैन येथे नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय

पाणी बचतीचे महत्व पटवून देण्याची आवश्यकता

शिरपूर दि.२९ मार्च (प्रतिनिधी) : Active न्युज

            शिरपूर जैन येथे राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नियमितपणे पाण्याचा पुरवठा होतो. परंतु नागरिकांना पाण्याचे महत्वच नसल्यामुळे दिनांक २४ मार्च शिरपूर वार्ड नं.६ मध्ये फार मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतांनाची बाब आमच्या प्रतिनिधीच्या निदर्शनात आली. वार्डातील नागरिकांशी चर्चा केली असता. नळाला पाणी आले त्या दिवशी वार्ड नं.६ च नव्हे तर शिरपूर येथे सर्वत्र अशाच प्रकारे पाण्याचा अपव्यय होतो अशी माहिती मिळाली. सदर बाब फार गंभीर असून याचे परिणाम सर्व जनतेला मे-जून महिन्यात सोसावे लागणार आहेत.

मानव निर्मित गटारगंगा

             शिरपूर जैन येथे पाण्याचा विनियोग कशा प्रकारे करावा या बाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे, कारण नागरिकांना मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने लोकांना पाण्याचे महत्व नाही,एकीकडे राज्याच्या अनेक भागातील नागरिक घोटभर पाण्यासाठी पायपीट करतांना आपणास दिसून येत असतांना शिरपूर येथे मात्र फार मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवले जाते भर उन्हाळ्यात सुद्धा रस्त्यांवरून पाण्याची नदी वाहतांना दिसून येत आहे.

       ‘पाणी हे जीवन आहे’ त्याचा वापर हा काटकसरीने करायला हवा परंतु शिरपूर येथे नळ योजने मार्फत ग्रा.पं.द्वारे प्रत्येक चार दिवसाला नियमित पाण्याचा पुरवठा केला जातो. ज्यामध्ये तब्बल अर्धा ते पावून तास फार मुबलक प्रमाणात नळाला पाणी सोडण्यात येते, काही नागरिकांनी तर २ – २ नळ जोडण्या घेतलेल्या आहेत. यामुळे शिरपूर येथील नागरिक आपले पाणी भरून झाल्यानंतर नळाला बंद न करता वाहने धुणे, विनाकारण रस्त्यांवर पाणी मारणे, अनेक नागरिक तर नळाचे पाणी भरून झाल्यानंतर पाण्याचा पाईप सरळ नालीत सोडून देतात. त्यामुळे नाल्या ओसंडून वाहतात व पाणी रस्त्यांवरून वाहायला लागते, मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतांना शिरपूर येथे दिसून येतो. सहजा सहजी प्रशासनाद्वारे नियमित पाणी मिळत असल्यामुळे ‘फुकटचे खाय त्याला सस्ते महाग काय’ या म्हणीचा प्रत्यय आपल्याला शिरपूर जैन येथे पाहायला मिळतो. इतरत्र आपणास पाणवठ्यांवर पाण्यासाठी झालेली गर्दी, काही ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकतांनाचे चित्र, अनेक गावांमध्ये टेकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु या प्रसंगांची प्रत्यक्ष जाणीव न झाल्यामुळे व मुबलक मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची पाणी वापराबाबत, व पाणी बचतीबाबतची नागरिकांची उदासीनता आपणास पहावयास मिळते. एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन शिरपूर येथील नागरिकांना पाण्याचे महत्व समजावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, कारण स्वतःहून पाणी वाचवण्याचे किंवा पाण्याचे काय महत्व असते याचा विसर येथील नागरिकांना पडलेला दिसतो आहे.

            प्रतिक्रिया –

पाणी पुरवढा करणाऱ्या कर्मचाऱ्याने पाणी वाटपाच्या वेळेचे नियोजन करून ज्यांच्या कडे २ नळ कनेक्शन आहेत त्यांचे १ कनेक्शन बंद करावे. तसेच पाणी भरून झाल्या नंतर नळाला टोपी लावून बंद करण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा काही नागरिकाच्या चुकी मुळे सर्वांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.नागरिकांनी सुद्धा पाण्याचे महत्व समजून पाणी जपून वापरावे. दिलीप विश्वंभर – अ.भा.भ्रष्टाचार.नि.सं.स.मुख्य संयोजक महा.प्रदेश

जाहिरात

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

जाहिरात

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close