You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइलसंपादकीय

तुका झालासे कळस

महाराष्ट्र मध्ये अनेक संत होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संत आहेत.वारकरी संतांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आणि त्याच प्रबोधनाच्या जोरावर आज महाराष्ट्रात शांतता नांदत आहे. अगदी बाराव्या शतकापासून जर विचार केला तर ज्ञानोबारायांनी नाथ परंपरा असेल, शैव परंपरा ,असेल वैष्णव परंपरा असेल, यांचा समन्वय साधून भागवत संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय यांचे पुनरुज्जीवन केले .याच परंपरेत एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई नामदेव महाराज इत्यादी संतांनी या सांप्रदाय रुपी मंदिराचे आधारस्तंभ होऊन या मंदिराला आधार देण्याचे काम केले. याच परंपरेत पुढे म्हणजेच अगदी सोळाव्या शतकात एक महान साधक संत ज्यांना समाजाने या मंदिर रुपी संप्रदायाच्या कळसाची उपमा दिली त्या जगद्गुरू तुकोबाराय यांचा समावेश होतो तुकोबारायांनी आपल्या 42 वर्षांच्या आयुष्यात अगदी नेत्रदीपक असं कार्य करून गगनाला गवसणी घातली. “अनु रेणू या थोकडा / तुका आकाशा एवढा” असे तुकोबारायाचे प्रमाण! तुकोबारायांनी गाथा रूपाने समाजाला फार मोठी शिकवण दिली, गाथ्या मधील अभंग हे तुकोबारायांचा अनुभव व्यक्त करतात. “अनुभव आले अंगा ते या जगा देत असो” असं तुकोबाराय सांगतात.

           तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना आपल्याला त्यांच्या जीवनाचे तीन भाग करता येतात एक संसारी तुकोबाराय, दुसरे साधक तुकोबाराय, तिसरे सिद्ध तुकोबाराय तुकोबारायांनी आपल्या जीवनाच्या साधारण 20 वर्षापर्यंत संसार केला त्यांना पहिली पत्नी रुक्मिणी जिचा आजाराने मृत्यू झाला. दुसरी पत्नी जिजाबाई, तीन मुली, दोन मुले, दोन भाऊ, आई वडील, चारशे एकर जमीन, दुकानदारी, सावकारकी असा श्रीमंत तुकोबारायांचा संसार. नंतरची दहा वर्ष तुकोबारायांनी भगवत्प्राप्ती ची साधना केली. तुकोबाराय म्हणतात “कोणी काहीतरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही” या साधकावस्थेत तुकोबारायांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला मग तो भोरवडा, भामचंद्र, भंडारा या डोंगरांवर साधना करत असताना असो की तेरा दिवसानंतर इंद्रायणीच्या डोहातून गाथा वर येणे असो “जळी दगडा सहित वह्या तारीयेल्या जैश्या लाह्या” हा तुकोबारायांच्या जीवनातील अनुभव आहे नंतरची उरलेली दहा ते बारा वर्षे तुकोबाराय हे सिद्ध अवस्थेत जीवन जगले एकदा देव भेटला की “आता दिवस चारी खेळीमेळी” अशी अवस्था तुकोबारायांचे होती आज बीजे च्या निमित्ताने आपल्याला तुकोबारायांचे सदेह वैकुंठ गमन यावर चर्चा करायची आहे. तुकोबारायांनी  निर्यानाचे अभंग हे एक स्वतंत्र प्रकरणच गाथ्यामध्ये लिहिलेले आहे. तुकोबारायांचा एकेकाळी विरोध करणारे रामेश्वर भट्ट तेसुद्धा तुकोबारायांचे भक्त बनले आणि तुकोबारायांची आरती करताना म्हणतात “तूकिता तुलनेने सी ब्रह्मा तुकासी आले म्हणुनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले” तुकोबाराय आपल्या निरयानाच्या अभंगात सांगतात की “आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी /सगळा सांगावी विनंती माझी” किंवा “अंत काळी आम्हा विठ्ठल पावला/ कुडी सहित झाला गुप्त तुका” मग विचार असा येतो की सदेह वैकुंठगमन शक्य आहे का या आधी कोणी सदेह वैकुंठाला गेल्याचे कोठे सापडते काय तर पाच हजार वर्षापूर्वी महाभारतात धर्मराज युधिष्ठिर हे आपला देह घेऊन स्वर्गात गेले असा महाभारतात उल्लेख आहे प्रत्यक्ष प्रमाण तर इतिहासाचे मिळत नसते पण इतिहास सिद्ध करता येतो तो शब्द प्रमाण आणि तर्क प्रमाण मानून मग सदेह वैकुंठ गमन झाल्याचा पुरावा म्हणजे तुकोबाच्या गाथेतील निर्यानाचे अभंग आहेत आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुकोबारायांची भक्ती आपल्या भक्ताचा शेवट हा पांडुरंग नक्कीच गोड करतो “याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा” असं तुकोबा म्हणतात म्हणून पुरावे देण्याची ची गरज नाही ही पण काही नास्तिक मंडळी या सदेह वैकुंठ गमन आवर आक्षेप घेतात त्यांच्यासाठी नाही तर आपला ही बुद्धी विक्षेप होऊ नये यासाठी पुरावे देणे गरजेचे आहे ज्या ठिकाणाहून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्या ठिकाणी आज नांदुरकी नावाचा एक वृक्ष आहे आणि तो वृक्ष बिजे च्या दिवशी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी हलतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आजही लाखो भक्त घेतात ज्यावेळेस तुकोबारायांचे निर्याण झाले त्यावेळेस तुकोबारायांचे अगदी जवळचे 14 टाळकरी तेथे उपस्थित तीत होते त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत संत कानोबा, संत रामेश्वर भट्ट वाघोलीकर, संत दास शिंपी, नामा सदुंब्रे कर, गंगाधर मवाळ, संताजी जगनाडे, नावजी माळी, गवर शेट वाणी, शिवाजी कासार पाटील, लोहगावकर भट्ट, पुराणिक मल्हार चिखलीकर, रंगनाथस्वामी निगडीकर, महंत कचरे श्वर ब्रम्ह, तसेच नंतर झालेले संत नारायण  देहूकर, बाळाजी जगनाडे, गोपाळ देवकर, वासुदेव महाराज देवकर, कवी मोरोपंत, मध्वनाथ मुनी, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांनी तर शेकडो पुरावे देऊन वैकुंठ गमन सिद्ध केले महिपती महाराज असो किंवा नाभाजी कृत भक्त माला असो या सर्वांनी तुकोबांचे वैकुंठगमन सिद्ध केले आहे स्वतः तुकाराम महाराज म्हणतात “हाती धरुनिया देवे नेला तूका नाही लौकीका चार जेथे” असे शेकडो पुरावे असताना इतर तर्क करणे हे निर्बुद्धपणा चे लक्षण ठरते तुकाराम महाराज म्हणतात “तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो” म्हणून आपल्या संतांवर आपल्या संत परंपरेवर विश्वास ठेवून आपण सुद्धा तुकोबारायांनी सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन करावे त्यांना चांगले वाटावे असे जर आपणाला वाटत असेल तर त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास “आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी”।      छत्रपती शिवाजी  महाराजांसारखा  जाणता राजा  याच काळात  राज्य करीत असताना  एवढ्या महान संत  तुकोबारायांचे शिष्यत्व स्वीकारले असताना  त्यांच्या केसालाही हात लावणे  हे शक्यच नाही आणि कुठलीही घटना शिवाजी राजेंच्या गुप्तहेरां पासून लपून राहणे हे शक्यच नाही हे तर सर्वांना मान्यच करावे लागेल म्हणून कुतर्क करणारांचा संतांवर विश्वास नाही पांडुरंगावर विश्वास नाही शिवाजीराजांवर विश्वास नाही म्हणून या लोकांना समाजात पिसाळलेल्या कुत्र्याची जी गत होते तीच व्हायला पाहिजे आणि होईल  ‘राम कृष्ण हरी’. 

  गणेश घोडे पाटील –  97 63 91 63 77

येथे जाहिरात फक्त २०० महिना (महिनाभरात १० हजार पेक्षा जास्त वाचकांपर्यंत पोहोचणार)

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close