You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनवाशिम

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सीमा राजगुरु यांचा सत्कार

प्रतिनिधी Active news

शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अत्यंत प्रतिष्ठेचा संत रविदास महाराज पुरस्काराचा बहूमान मिळाल्याबद्दल सौ. सिमाताई राजगुरु यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ वाशीम जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्काराचा कार्यक्रम देवानंद राजगुरु यांच्या निवासस्थानी १३ मार्च रोजी घेण्यात आला.


सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजीत नाशिक येथे पार पडलेल्या कार्यक्रमात समाजकल्याण मंत्री ना. राजकुमार बडोले व इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश महासचिव सौ. सिमाताई राजगुरु यांना सन २0१८-१९ चा संत रविदास महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाधान माने, जिल्हा सचिव डॉ. भागवत राजगुरु, युवा जिल्हाध्यक्ष राहुल तुपसांडे, वाशीम शहराध्यक्ष सतिश खंडारे, उपाध्यक्ष दत्तराव राजगुरु, न.प. सभापती सौ. हेमाताई इंगळे, माजी शहराध्यक्ष प्रभाकर पद्मणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी संत रविदास महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या वतीने न.प. सभापती सौ. हेमाताई इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ. सिमाताई राजगुरु यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. आपल्या सत्काराबद्दल बोलतांना सौ. राजगुरु म्हणाल्या की, गेली अनेक दिवसापासून समाजाचे कार्य करीत आले. या समाजपयोगी कायार्ची शासनाने दखल घेवून पुरस्कार दिल्याबद्दल शासनाचे आभार मानते. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून नवा उत्साहही संचारला आहे. पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे व त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य अविरतपणे करु असा विश्‍वास सौ. राजगुरु यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून झुंजारेसर, आदर्श मुख्याध्यापिका सौ. शांताबाई झुंजारे, सौ. राजकन्या राजगुरु, दशरथ राजगुरु, सौ. विमल दत्तराव राजगुरु, विठ्ठल मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महादेव राजगुरु, सुमित्रा राजगुरु, सौ. विमलताई इंगळे, सौ. मिना सुखदेव राजगुरु, शांताबाई इंगळे, पुरुषोत्तम राजगुरु आदी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवती जिल्हाध्यक्षा सौ. संगीता राजगुरु यांनी तर आभार कर्मचारी जिल्हाध्यक्ष देवानंद राजगुरु यांनी मानले. असे जिल्हा सचिव डॉ. भागवत राजगुरु यांनी कळविले आहे

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close