You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनमालेगाव

कुस्ती महासंग्रामात कुरुडवाडीचा महारुद्र काळे एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेचा मानकरी…

शिरपूर दि११  (प्रतिनिधी): active news

महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त शिरपूर जैन येथे दि.१० मार्च रोजी ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला होता. या महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले.

दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या मैदानावर ओंकारगीर कुस्ती मंडळाच्यावतीने कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला जातो. त्यानुसार या वर्षीही १० मार्च रोजी कुस्त्यांचा महासंग्राम संपन्न झाला. या महासंग्रामाचे उद्घाटन संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्त्याचा महासंग्रामात महाराष्ट्रासह दिल्लीच्या पैलवानांनी ही सहभाग घेतला होता. या महासंग्रामातील पहिले बक्षीस उमेश इंगोले, रमेश इंगोले यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये, तसेच गणेश घोडमोडे यांच्यावतीने चांदीची गदा ठेवण्यात आली होती. याचा मानकरी हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा येथील गजानन पैलवान यास चित करून कुरूडवाडीचा महारुद्र काळे हा विजेता ठरला. अयुब ठेकेदार आणि विलास गवळी यांच्या ७१ हजाराच्या बक्षिसाचा मानकरी कुरूडवाडी येथील सागर माटे, प्रशांत देशमुख आणि अरुण कालवे यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ५१ हजाराच्या तिसऱ्या बक्षीसाचा मानकरी हिंगोलीचा ज्ञानेश्वर गादेकर, रमजान रेघीवाले, दस्तगीर पैलवान यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या ४१ हजारांच्या चौथ्या बक्षीसाचा मानकरी आटपाडीचा संदीप काशीद ठरला. पाचव्या क्रमांकाचा मानकरी वाशिमचा भाऊ पांढरे, सहाव्या क्रमांकाचा मानकरी इंदापूरचा सचिन वाघ, सातव्या क्रमांकाचा मानकरी शिरपूरचा शाहरुख, आठव्या क्रमांकाचा मानकरी लोहगावचा ज्ञानेश्वर, नवव्या क्रमांकाचा मानकरी सागर, दहाव्या क्रमांकाचा मानकरी  निमगावचा विजय, तर अकराव्या क्रमांकाचा मानकरी नंदू घोडके हा ठरला. उमेश इंगोले, रमेश इंगोले या भावंडांनी ठेवलेले एक लाख रुपयांचे प्रथम बक्षीस त्यांच्याच हस्ते आणि गणेश घोडेमोडे यांनी ठेवलेली चांदीची गदा हे बक्षीस त्यांच्याच हस्ते विजेता महारुद्र काळे यास देण्यात आले. यावेळी अशोकराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश भालेराव, सुदर्शन गाभणे, आशीष देशमुख, पंजाब नाईक, राजू कुंडलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. कुस्त्यांच्या महासंग्राम यशस्वी आयोजनासाठी ओंकारगीर कुस्तीगीर मंडळाचा पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले, तर संभाजी नवयुवक मंडळाच्यावतीने कुस्त्यासाठी आलेल्या राज्यभरातील पहिलवान व त्यांच्या सहकाºयांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था केली होती.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close