You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशवाशिम

आज ‘संविधान बचाओ’ अभियानांतर्गत जिल्हाबंद ची हाक

वाशीम – ( दि. ०५ मार्च  )

‘संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ’ अभियानाअंतर्गत मंगळवारी , दि. ०५मार्च रोजी देशातील ३१ राज्यांमध्ये आणि ५५० जिल्हयांमध्ये राष्ट्रव्यापी बंद आंदोलन होत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हाभर  बंद आंदोलन होणार असल्याची माहिती संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने एका पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

     या बंद आंदोलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता वाशिम शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅली काढून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जाणार आहे. इतर शहरांमध्ये सुद्धा रॅली काढून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.     या अभियाना अंतर्गत काढण्यात आलेल्या पत्रकानुसार विविध विषयावर हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये, निवडणूकीत वापरल्या जाणार्‍या ईव्हीएम मशिनला जोडण्यात येणारा व्हीव्हीपॅट यंत्राच्या मधुन निघणार्‍या पेपर ट्रेलच्या पुुनर्मतमोजणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही भारतीय निवडणूक आयोगाने त्याचे पालन करण्यासाठी नकार दिला. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जेलभरो आंदोलन होणार आहे. त्यासोबतच सवर्णांना दिलेल्या १० टक्के आर्थिक आधारावरील आरक्षण  संविधानविरोधी असल्यामुळे तात्काळ रद्द करा, शिक्षणा क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये असलेली १३टक्के बिंदुनामावली रद्द करुन पुर्वीप्रमाणे असलेली २०० टक्के बिंदुनामावली कायम करावी, जातीनिहाय जनगणना करुन १०० टक्के आरक्षण लागु करा, धार्मिक अल्पसंख्यांकांवर होणारा हिंसाचार बंद करा, अतिमागास जातींचे केंद्रीय स्तरावर स्वतंत्र वर्गीकरण करा, आदिवासींना संविधानाची ५आणि ६ अनुसुचि लागु करुन  त्यांना जल, जमीन आणि जंगलाची सुविधा द्या, एससी, एसटी, ओबीसींना आरक्षणात वर्गीकरण लागु करा, एससी, एसटी, ओबीसींना खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करा, आदी महत्वाच्या मुद्यांसह इतर मुद्यांवर हे देशव्यापी बंद  आंदोलन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील वाशिम, मालेगाव, कारंजा व मंगरुळपिर या शहरांमध्ये हे बंद आंदोलन होणार आहे. तरी या आंदोलनात व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या देशव्यापी बंदला सहकार्य करावे तसेच नागरीकांनी या आंदोलनात  बहूसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                           

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close