You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइल

शिवजयंती निमित्त राष्ट्रीय एकात्मतेच्या व्याख्यानाचे आयोजन

रामसेना ग्रुपचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी/ANN

    शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करायची असते. छत्रपती शिवराय डोक्यावर नव्हे तर डोक्यात घ्यायचे असतात, असा बहूमोल संदेश देण्यासाठी स्थानिक रामसेना ग्रुपच्यावतीने दि.११ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

      दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची ३८९वी जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी होत आहे.शिवजयंती सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.डिजे लावून,झिंगाट नाचून, मोटर सायकल रॕली काढून, मिरवणूक काढून, भगवे ध्वज लावून- फेटे बांधून, प्रतिमा पूजन करुन, पोवाडे वाजवून व इतर प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते. परंतू स्थानिक रामसेना ग्रुपने विचारांची-एकात्मतेची शिवजयंती साजरी करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी रामसेना ग्रुपने दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानचे अध्यक्ष शेख सुभानअली,वसमत यांचे राष्ट्रीय एकात्मतेचे व्याख्यान आयोजित केले आहे.

   शिवरायांचे स्वराज्य हे समतेसाठी-न्यायासाठी होते की धर्मासाठी? या विषयावर शेख सुभानअली यांचे व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जात,धर्म,पंथ,प्रांत गुण्यागोविंदाने नांदावेत. आप-आपसांतील प्रेम, बंधूभाव वृद्धींगत व्हावा, समाजात सहिष्णूता निर्माण व्हावी.या सर्वासाठी समाजात परस्पर विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण करण्यासाठीच शेख सुभानअली यांचे व्याख्यान आयोजित केल्याचे रामसेना ग्रुपच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

     हे व्याख्यान संध्याकाळी ६ वाजता ढवळे विद्यालयासमोरील शिक्षक कॉलिनी चौकात संपन्न होणार आहे.या व्याख्यानाचा सर्व शिवप्रेमी जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन रामसेना ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

विडीओ बघण्यासाठी क्लिक करा.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close