ब्रेकिंग

दिव्यांग व मूकबधिर विद्यालयाच्या प्रशासक नियुक्ती आदेशावरील स्थगिती उठविण्यासाठी आमरण उपोषण

0 0 6 4 5 2
[wonderplugin_carousel id="1"]

वाशिम : ( दि. 14 ऑगस्ट )
दिव्यांग व मूकबधिर निवासी विद्यालयावर समाजकल्याण मंत्रालयाने पारित केलेल्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशावर तीन वर्षांपूर्वी आणलेली तात्पुरती स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी पीडित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ मंगरूळपीर द्वारा संचालित मूकबधिर निवासी विद्यालय तुळजापूर व अपंग निवासी विद्यालय तुळजापूर येथील कार्यरत कर्मचारी असून संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापकांच्या अतोनात छळाला कंटाळून सन 2019 पासून जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत असतांना कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रादेशिक उपायुक्त अमरावती यांना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिले. मात्र, ठोस कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी समाज कल्याण मंत्रालयाचे सचिवांनी सन 2020 मध्ये एका आदेशाद्वारे सदर विद्यालयावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली होती. सदर नियुक्तीवर संस्थेच्या वतीने तात्पुरती स्थगिती आणण्यात आली होती. मात्र, या स्थगितीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही समाज कल्याण विभागाने सदर स्थगिती उठविण्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे जोपर्यंत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली स्थगिती उठवून तेथे मंत्रालयीन आदेशानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकाचा कार्यभार सोपविला जात नाही. तोपर्यंत हे उपोषण केले जात असल्याचे उपोषणकर्त्या शिक्षकांनी सांगितले. तसेच व्ही एम ढोले, एस आर शेख, कु. एस डी फुकटे आदी शिक्षकांना स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करून थकित वेतन अदा करावे, एफ डी निजामी यांना इतरत्र समायोजित करून रुजू करावे व त्यांचे थकीत वेतन काढावे, ज्ञानेश्वर राठोड व ए ए खान यांना इतरत्र समायोजित करून वेतन काढावे, सर्वांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून फरक द्यावा, विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी व प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची कार्यालयामार्फत सखोल चौकशी करावी, कार्यरत कर्मचाऱ्यांची चौकशी करून मान्यता रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांची वेतन वसुली करावी तसेच संस्थेविरोधात दाखल विविध गुन्हे व उच्च न्यायालयात नागपूर येथे असलेल्या प्रलंबित खटल्यांचा पाठपुरावा करून ठोस कार्यवाही करावी आदी मागण्यासाठी सदर उपोषण केले जात आहे . उपोषणात व्ही एन ढोले, एस आर शेख, कु. एस डी फुकटे, एफ डी निजामी, डी एस राठोड, ए ए खान आदी शिक्षक सहभागी झाले आहेत. सदर मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी प्रशासनास दिला आहे.

– आमरण उपोषणास बसलेले शिक्षक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 2
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे