You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममालेगाव

शिरपूर ग्रा.पं.सरपंच,सचिवांनी केला तब्बल २६ लाखांचा घोटाळा ?

प्रतिनिधी/शिरपूर : ग्रामपंचायत शिरपूर येथे १४ वित्त आयोगा अंतर्गत रस्त्याचे पेव्हर ब्लॉक सिमेंट कॉंक्रीट रस्ता आणि नाली बांधकाम करण्यात आलेले आहे सदर बांधकामांमध्ये सरपंच व सचिव यांनी आर्थिक अपहार करून भ्रष्टाचार केलेला आहे असे आरोप करणारे पत्र ग्रामपंचायतच्या माजी २ सरपंच व विद्यमान ७ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब वाशिम यांच्याकडे दिनांक १४/०१/२०१९ रोजी तक्रार केली आहे.

शासन नियमानुसार मुदतीची निविदा प्रक्रिया न राबविता ऑनलाइन निविदा सूचना न काढता सरपंचाचे नातेवाईक तथा मर्जीतील कंत्राटदारास कामे देऊन सरपंच तथा सचिव यांनी तब्बल २६ लाख ७१ हजार ७२५ रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार विद्यमान ७ ग्रामपंचायत सदस्य २ माजी सरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोमवार दिनांक १४ जानेवारी रोजी तक्रार केली शिरपूर ग्रामपंचायत १४ वित्त आयोग अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट रस्ते आणि नाली बांधकाम करण्यात आले. यातील पेव्हर ब्लॉकची ११ लाख ३ हजार २७६ रुपये किमतीचे कामे सरपंच व सचिवांनी मर्जीतील ठेकेदार सरपंच सुनीता अंभोरे यांचे नातेवाईक दीपक मडके यांना बेकायदेशीररीत्या दिले विशेष म्हणजे ई-निविदा मागविण्याच्या जो कालावधी असतो त्याची कुठलीही अंमलबजावणी करण्यात आले नाही. तसेच कुठलेही काम न करता २८ डिसेंबर २०१८ ला ई-निविदा होण्याच्या दिवशीच दीपक मडके यांना दहा लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला. त्यातील ३ लाख रुपये दीपक मडके यांनी सरपंच यांचे दिराच्या बँक खात्यात जमा केले यावरून संगनमताने अपहार केल्याचे सिद्ध होत आहे. संपूर्ण पेवर ब्लॉक कामावर बांधकामाची एकच ई निविदा करणे आवश्यक होते परंतु अपहार करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी वेगवेगळे ई निविदा मागवल्या व ग्रामपंचायतीने काही कामे स्वतः केली त्यामुळे सरपंच सचिव यांचा गैर हेतू सिद्ध होतो असे तक्रारीत नमूद केले आहे.

 व ग्रामपंचायत शिरपूर येथील १४ वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांमध्ये सरपंच/सचिव यांनी भ्रष्टाचार करून अपहार केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडून सदर कामाचे अपहरित रकमेची वसुली करण्यात यावी असे तक्रारीत नमूद केले असून माजी सरपंच सुशांत जाधव यांनी सांगितले की जर कारवाई नाही झाली तर आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन छेडू वेळ आल्यास आम्ही आत्मदहन करणार सुद्धा तयार आहोत.

या प्रकरणी ग्रा.पं.सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही

प्रतिक्रिया –

१.माझ्या कार्यकाळात ग्राम पंचायतमार्फत जी कामे झालेली आहेत ती सर्व नियमानुसारच झालेली आहेत.आणि जर कुठे भ्रष्टाचार झालेला आहे अशी तक्रार असेल तर सरपंच स्वतःच त्याची चौकशी लावणार आहे.- सौ.सुनिता गणेश अंभोरे सरपंच ग्रा.पं.शिरपूर

२.कंत्राटदारानेने जे पैसे मला दिले आहेत त्याबाबत मी त्याला माझे कन्स्ट्रक्शन व्यवसाय असल्यामुळे जे साहित्य व मशनरी पुरविली होती त्याबाबत असून मी तशा पावत्या व बिले सुद्धा दिलेली आहेत. व हे सर्व आरोप खोटे आणि राजकीय दृष्ट्या बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. – विजय अंभोरे

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..  आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close