ब्रेकिंग

विधि महाविद्यालयात महिलादिन साजरा

समाजाने आम्हाला सामावून घ्यायला हवे, तरच बदल शक्य : किरण अम्मा तृतीयपंथी यांच्या गुरू

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

तृतीय पंथीयांचे नैतिक अधिकार जोपासण्याची गरज- प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे

वाशीम,

येथील अॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालय ५ ते ८ मार्च दरम्यान आयोजित शिबिरात तृतीय पंथीयांचे अधिकार जोपासण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. दाभाडे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला सप्ताह दिनाचे विविध कार्यक्रमांतर्गत आयोजन अॅड. रामकृष्णजी राठी व स्व. सुभाष राठी यांचे प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनांक ०५ मार्च रोजी समन्वयिका प्रा. ललिता दाभाडे यांनी महिला सक्षमीकरण व कायदे या विषयावर अतिथी सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. शुभांगी खडसे यांचे मार्गदर्शन तथा याच विषयावर पीपीटी स्पर्धा आयोजित केली.

दिनांक ६ मार्च रोजी समन्वयिका प्राध्यापिका भाग्यश्री धुमाळे यांनी सायबर क्राईम व स्त्री संरक्षण या विषयावर सायबर सेलचे अधिकारी प्रमोद इंगळे यांचे मार्गदर्शन व त्याच विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित केली.

तर ७ मार्च रोजी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ. सागर सोनी यांनी तृतीयपंथीयांचे अधिकार या विषयावर तृतीयपंथी किरण अम्मा यांचे मार्गदर्शन व त्याच विषयावर स्पर्धा आयोजित केली.

८ मार्च रोजी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ. सुशांत चिमणे यांनी जागतिक महिला दिना निमित्त सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या समाज सेविका सौ किरण ताई गिर्हे यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे कडून सौ किरण ताई गिर्हे यांचायथोचित सन्मान करण्यात आला.

प्रारंभी अॅड. शुभांगी खडसे यांनी घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा व पीसीपीएनडीटी कायदा यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. दुसया दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये सायबर सेल प्रमुख ए पी आय प्रमोद इंगळे यांचे सहकारी गोपाल चौधरी यांनी विविध सायबर क्राईम वर पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. तृतीय दिवशी तृतीयपंथीयांचे अधिकार या विषयावर तृतीयपंथी गुरू किरण अम्मा यांनी विद्यार्थ्यांना तृतीयपंथीयांचे अधिकार व समस्या यावर आपले मनोगत व्यक्त केले. तर दिनांक ०८ रोजी वाशीम येथील समाजीक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या किरणताई गिऱ्हे यांनी विधीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. प्रकाश दाभाडे यांनी तृतीय पंथीयांना सर्वोच्च न्यायालयाने नालसा विरुद्ध केंद्र सरकार ह्या न्यायनिर्वाळयानुसार अधिकार दिले असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे समन्वयक समन्वयक प्राध्यापक डॉ. सुशांत चिमणे, प्रा. डॉ सागर सोनी यांनी प्रास्ताविक तर आभार प्रा. डॉ. भाग्यश्री धुमाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे, प्रा.ललिता दाभाडे, प्राध्यापक डॉ. सुशांत चिमणे, प्रा.सागर सोनी, प्रा.भाग्यश्री धुमाळे,  प्रा. संजय इंढोळे, महादेव सोमानी, राहुल पांडे, जितेंद्र अग्रवाल, उमेश ओझा, शैलेश घोडके यांच्यासह पौर्णिमा मुराई, गोपाल वाढे, शिवाजी बळी आदर्श दामोदर, प्रल्हाद राजगुरू, आकाश राजगुरू, वैभव गोरे, प्रेरणा पट्टेबाहदूर, गजानन भड, कारूनिक सरकटे, सागर मानकर,उर्वशी मालपाणी, अंकिता राठोड, फिझा खान, स्वरदा दंडे, विठ्ठल कढणे, राहुल मोरे, विकास राऊत तथा सर्व विधी विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे