You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
संपादकीय

स्वराज्य संकल्पिका युग नायिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ !

मानवता वादाची शिकवण देणाऱ्या छत्रपति शिवाजी महाराजांना जन्मापासून ते छत्रपती पदापर्यंत पाहोचविणारी एकमेव व्यक्ती म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. अफजल खानाच्या भेटी प्रसंगी जिजाऊ म्हणतात ” तुम्ही कामी आलात तर भीती बाळगु  नका तुमच्या पाठीमागे मी बाळ शंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती कारेन” हा दृढ निश्चय मस्तकात जागृत ठेवणारी जिजाऊ ! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षां पैकी पंचेचाळीस वर्षे त्यांचेवर मातेचे पांघरून घालणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ !

राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी तर वडिलांचे नाव लखुजी जाधव होते ते सिंदखेड राजाचे जहागीरदार होते. जिजाऊंना सर्वच प्राथमिक शिक्षण, युद्धशिक्षण, राजीनीती, भाषा, अनेक खेळ  बालपणीच शिकविले होते. अनेक भाषावार त्यांचे प्रभुत्व होते.

       त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्या सोबत थाटात संपन्न झाला. शहाजीराजे व लखुजीराजे हे जावई सासरे एकत्र आल्यास ते स्वतत्र राज्य स्थापन करतील या भीतीने निजामशहाने देवगिरीच्या किल्ल्यात १६२९ रोजी लखुजी जाधवांची हत्या घडवून आणली शहाजी व जिजाऊनी  या घटनेतून आपल्या राजकारणाची दिशा ठरवली.

याच कालावधी मध्ये जिजाऊंच्या पोटी संभाजी नावाचा पुत्र जन्मास आला व त्यानंतर चार अपत्य झाली व त्यांचे सहावे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजआहेत . जिजाऊ शहाजींनी , संभाजी व शिवाजी या दोन्ही पुत्रांना शास्त्र, शस्त्र, राजनीती भाषा , विज्ञान, भूगोल अशा सर्वत्र क्षेत्रात पारंगत केले होते.

           सण १६२९ मध्ये आदीलशाह चा सरदार मुरारजगदेव याने पुणे उध्वस्त केले होते व त्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता आणि तेथे पहार रोवून त्यावर फाटकी चप्पल, तुटक झाडू ,फाटके वस्त्र टांगून अशुभ जाहीर केले होते. जो कोणी ती पहार उपसून काढेल  व तिथे अस्तित्व करेल त्याचा निर्वंश करण्यात येईल असे फर्मान सोडले होते सर्व रयत  पुणे सोडून परागंदा झाली होती .जिजाऊंनी ती पहार उपसून सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली हि शापित भूमी ताब्यात घेतली तेथे बाल शिवबासाठी लाल महाल बांधला व अंधश्रद्धा, धार्मिक दहशतवाद गाडून त्यास मूठमाती दिली. शहाजीराजांनी त्यांना स्वतंत्र राजमुद्रा व भगवा झेंडा दिला भरपूर पैसे, प्रशीक्षीत नोकर चाकर पैसा दिला. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे नामकरण जिजापूर असे करण्यात आले.

          आजचे पुणे शहर हे जिजाऊंनी वसविलेले पूर्वीचे जिजापूर शहर होते. जिजाऊंनी शेतीसाठी पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी धरणे बांधून घेतली शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या रयतेला सुरक्षेची पूर्ण हमी दिली शिवबास सर्व क्षेत्रात निपूर्ण केले. शिवबाना राजनीती शिकविताना भगवान श्रीकुष्णचे “महाकाला” हे सूत्र सांगितले श्रीकृष्णाने सर्व जातीय शेतकरी गवळ्याची मुले एकत्रित करून त्यांच्या शिदोऱ्याचा महाकाला  केला व एकत्रित जेवण करून अस्पृश्यता व विषमता संपवली. त्यांना सामूहिक शक्तीची जाणीव करून दिली त्यातून गवळ्याच्या पोरांनी महाबलशाली देवांचा राजा इंद्रास हरवले होते. याच सूत्राचा वापर करून जिजाऊंनी सह्याद्रीच्या खोऱ्यात सर्वच जाती धर्मातील तरुणांना संघटित केले. जिजाऊंच्या सत्यव्यवहारी मार्गदर्शनाखाली बाल शिवबांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य सुरु झाले होते. जहागीर दाराचा पुत्र अशी ओळख विसरून शिवबा शेतकरी, कोळी , अधिवासी , मांग, महार, चांभार, मुसलमान, मराठे कुणबी अशा विविध जाती धर्माच्याआठरा पगड जातीतील गोर गरीब मुलांसोबत एकत्र राहू लागले, एकत्र  जेवणे, फिरणे, शिक्षण , प्रशिक्षण घेतले यातूनच त्यांना रयतेचे दुःख समजले जिजाऊंनी स्वतः जहागीर दारांची पत्नी म्हणून काधीही वावरल्या नाहीत जिजाऊंची राहणीमान अतंत्य साधे होते. त्यामुळे रयतेला जिजाऊ नेहमी आपल्यातील वाटत असत. महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य फूलत होते.स्वराज्याचा विस्तार वेगाने वाढू लागला हे सर्व घडत असताना शिवराय हे अधिकृतपणे स्वतत्र राजे नव्हते. यासाठी जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेकाचा निर्णय घेतला त्यासाठी राजधानी म्हणून किल्ले रायगडाची निवड करण्यात आली राजधानीसाठी रायगडावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. दि. ०६ जुन १६६४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला महाराज छत्रपती झाले मावळ्यांचे स्वप्न पूर्ण झाले जिजाऊ शहाजीच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले या स्वराज्याचे खरी एकमेव प्रेरणा फक्त राष्ट्रमाता जिजामाता आहेत.

      शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि जिजाऊंचा निर्धार पूर्ण झाला शिवराज्य भिषेकाचा परमोच्च आनंद डोक्यात साठवून रयतेची माता राष्ट्रमाता, राजमाता , यांनी १७ जुन १६७४ रोजी देहत्याग केला जगातील सर्वश्रेष्ठ राजनीतीतज्ञ, सर्वश्रेष्ठ भाषातज्ज्ञ , जगातील सर्वोत्कृष्ट मातृत्व, कर्तृत्व  नेत्रुत्व म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजामाता त्यांचा आज १२ जानेवारी जन्म दिवस त्यांना त्याच्या  विनम्र अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा….

गजानन देशमुख शिरपूर

मो. नं. ९९२३६७६५६०

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close