You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमरिसोड

जुन्या वादा वरून चिखली येथे युवकाचा खुन;आरोपी ताब्यात

active न्युज network

रिसोड : तालुक्यातील चिखली सरनाईक येथील पवन पंडितराव सरनाईक वय २३ या युवकाचा त्याच्या चुलत भावाने शेतीच्या जुन्या वादातुन खुन केला आहे. ही घटना गुरुवार सकाळी  ७ वाजताच्या सुमारास चिखली शेतशिवारात घडली आहे.  

मृतकाचे वडील पंडीतराव सरनाईक व आरोपीचे वडील डिगांबरराव सरनाईक हे सावत्र भाऊ असून यांच्यात गत १० वर्षापासून शेतीचा वाद होता. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून याच वादातून डिगांबर सरनाईक हे सहकुटुंब चिखली गाव सोडून केशवनगरला राहायला गेले होते. मधल्या काळात मृतक पवन सरनाईक यांचे कुटुंबीय चिखली येथील त्यांचे शेत वैती करता चिखली येथे वास्तव्यास होते. दरम्यान घटनेच्या दिवशी गुरुवार१० जानेवारी रोजी मृतक पवन सरनाईक हा दैनंदिन नित्यनेमाप्रमाणे त्याच्या शेतात रात्री झोपायला गेला होता.  सकाळी शेतातुन घराकडे परतीच्या मार्गावर असतांना  शेतामध्येच दिगंबर सरनाईक व गजानन सरनाईक यांनी त्यास अडविले व विचारणा सुरू केली. की माझ्या धुरयाने का जातो असे मृतक पवन सरनाईक यास हटकले असता त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले दरम्यान आरोपी गजानन सरनाईक व त्याचे वडील दिगंबर संजाबराव सरनाईक या दोघा बापलेकांनी पवन सरनाईक यास धरून पोटात चाकू भोसकून ठार केले. घटनेची फिर्याद शंकर गोविंद सरनाईक यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली असून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गजानन दिगंबर सरनाईक व पंजाबराव सरनाईक यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिरसाट करीत आहेत.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close