You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगाव

शिरपूर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामास अंतरिम स्थगिती

प्रतिनिधी/शिरपूर :

active न्युज network

 शिरपूर ग्रामपंचायत च्या मासिक सभेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. विरोधी पक्षाने सदर कामात प्रचंड अनियमितता होत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकरणी दिनांक २८ डिसेंबर रोजी संपूर्ण प्रक्रियेस अंतरिम स्थगिती दिली आहे.

 येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकरणात  प्रचंड अनियमितता व शासनाचे नियम डावलून, कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता शॉपिंग कॉम्प्लेक्स  बांधकामास ग्रामपंचायतने मंजुरी दिली होती. शिरपूर ग्रा.प.च्या ७ सदस्यांनी दीपाली जाधव सह ७ सदस्यांनी सदर प्रकरणाची माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. सदर शॉपिंग कॉम्प्लेक्स भुमिअभिलेख मोजणी करून तसेच बांधकामाची व गाळे वाटपाची नियमावली तयार करून तसेच ग्रामपंचायत ची स्वतःची मालकी हक मोजणीनंतर निश्चित झाल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करण्यात यावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. शिरपूर ही ग्रामपंचायत पर्यटन व तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्गाच्या दर्जाची असून भविष्यातील तीर्थाच्या दृष्टीने रस्ते वाढ, सार्वजनिक स्वच्छतागृह याचा विचार करून इतरत्र बांधकाम करावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते .

परंतु ग्रामपंचायतने विरोधी पक्षास विश्वासात न घेता ,व कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता बेकायदेशीर रित्या सदर गाळे   बांधकामाच्या ई-निविदा मागविल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे दिनांक २१/०२/२०१८ शिरपूर येथील संपूर्ण अतिक्रमण काढून शहर विकास आराखडा तयार करून त्याची  मंजुरात घ्यावी तोपर्यंत कोणतीही विकासकामे करता येणार नाहीत. असा स्पस्ट आदेश दिलेला आहे. ग्राम पंचायतीने माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाची पूर्तता न करता गाळे बांधकामाची बेकायदेशीर कार्यवाही चालू केली आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी तक्रारदाराने केलेल्या विनंतीनुसार व मागणीप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १५४  सहकलम १५३ नुसार ग्रामपंचायतने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली इ निविदा व तांत्रिक मंजुरी आदेशाची अंमलबजावणी  तहकूब करण्यात आली आहे मा.जिल्हाधिकारी वाशिम यांनी सुनावणीपर्यंत संपूर्ण प्रकरणास अंतरिम स्थगिती दिनांक २८ डिसेंम्बर २०१८ रोजी दिली आहे. त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकरणात आता वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्पलेक्स बांधकाम काम आता थंड बसत्यात पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे .

प्रतिक्रिया –

  • ग्रामपंचायतने शासनाचे नियम डावलून ,कायदेशीर प्रक्रिया  पार न पाडता शॉपिंग कंपलेक्स बांधकामास मंजुरी दिली होती त्यामुळे सदर शॉपिंग कंपलेक्स हे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हती शहरातील व्यावसायिकांना माफक दरामध्ये पन्नास ते साठ हजार रुपयांमध्ये दहा बाय दहा फुटाचे कॉम्प्लेक्स मिळावे  यासाठी विरोधी पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे .

सौ दिपाली सु.जाधव

ग्रामपंचायत सदस्य शिरपूर

२) माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश प्राप्त झालेला नाही आदेशाची प्रत मिळताच  पुढील  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अरुण इंगळे सचिव ग्रा.प.शिरपूर

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close