You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमवाशिम

जिल्ह्यातील ६३ ग्रामसेवकांवर प्रशासकीय कार्यवाही

active न्युज network

प्रतिनिधी / वाशीम 

८० लाखांची अफरातफर प्रकरण, जिल्ह्यातील २७ सरपंचांवरही वसुलीची कुर्‍हाड, अपहार करणारांच्या संख्येत दुपटीने वाढीची शक्यता, विस्तार अधिकार्‍यांच्या २ वार्षिक वेतनवाढी तात्पुरत्या बंद, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांची मोठी कारवाई

पंचायतराज समितीच्या इतवृत्तानुसार लेखा परिक्षण अहवालामध्ये जिल्ह्य़ातील ७४ ग्रामपंचायतीत सुमारे रु.८0 लाखांवर संशयीत अपहार झाला आहे. या प्रकरणामध्ये वसुलपात्र ६३ ग्रामसेवकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. या ६३ ग्रामसेवकांसह एकूण २७ सरपंचांवरही अपहार प्रकरणी वसुलीची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयीत दोषी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडुन विहित मुदतीत कार्यवाही न केल्याबददल सहाही तालुक्यातील पंचायत विस्तार अधिकारी यांच्या २ वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या कारवाईमुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

पंचायत राज समितीने दिनांक १७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान वाशिम जिल्हयाचा दौरा केला होता. त्याचे इतवृत्त जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असुन मुंबई येथे पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसमोर दिनांक २ जानेवारी २०१९ रोजी साक्ष होणार आहे. या साक्षीदरम्यान पंचायतराज समितीच्या इतवृत्तानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने अनुपालन सादर करण्यात येणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पीआरसीच्या ईतवृत्तानुसार सन २००१ ते २०१० या दरम्यान लेखा परिक्षण अहवालामध्ये जिल्हयातील ७४ ग्रामपंचायतीत सुमारे रु.८० लाखांवर संशयीत अपहार झाला आहे. वसुलपात्र रक्कमेनुसार संबंधित ग्रामपंचायतीचे सचिव यांच्यावर एक आठवडयाचे आत प्रशासकीय कार्यवाही करण्याचे व त्यांच्या मुळ सेवा पुस्तकामध्ये नोंद घेण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले आहेत. या प्रशासकीय कार्यवाहीचे स्वरुप अपहार केल्याच्या रकमेनुसार भिन्न आहे. रु. एक हजार च्या आतिल अपहारावर ठपका ठेवणे, रु. १ हजार ते १० हजार पर्यंत १ वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद आणि रु. १० हजारांवरील रक्कमेसाठी २ वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी मीना यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दि. २९ डिसेबर रोजी सायंकाळी गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत निहाय आदेश काढले. या आदेशानुसार संबंधित ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्याकडुन गटविकास अधिकारी यांनी अपहारीत रक्कम समप्रमाणात वसुल करुन तात्काळ अनुपालन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये ६३ ग्रामसेवकांसह २७ सरपंचांचा समावेश आहे. जे सरपंच वसुलपात्र रक्कम भरणार नाहीत त्यांच्या सातबारा वर बोजा चढविला जाणार असुन पुढील निवडणुकील अपात्र समजण्यात येणार आहे. संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडुन वेळेत कार्यवाही न केल्याबददल सर्व पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांची २ वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

अपहार करणार्‍यांच्या संख्येत दुपटीने वाढीची शक्यता 
               पंचायतराज समितीच्या इतवृत्तानुसार जिल्हयातील एकुण ७४ ग्रामपंचायतींमध्ये रु ८० लाखाच्या वर संशयीत अपहार झाला असल्याचे नमुद आहे. यापैकी ३५ ग्रामपंचायतीचे ६३ सचिव आणि या ३५ मधील २७ सरपंचांना नावानिशी जबाबदार धरण्यात आले आहे. उर्वरीत ३९ ग्रामपंचायतीमध्ये सुध्दा अपहार झाला असल्याचे पीआरसीने नमुद केले मात्र त्यामध्ये संबंधित सरपंच व सचिवांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. सदर ग्रामपंचायतीमध्ये तत्कालिन सरपंच व सचिवाच्या नावांची यादी संबंधित गटविकास अधिकारी यांना मागविण्यात आली आहेत. ती नावे आल्यास अपहारास जबाबदार व्यक्तींची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या इतिहासात सरपंच आणि ग्रामसेवकांवर एकाच वेळी एवढयामोठया प्रमाणात कारवाईची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. पीआरसी च्या साक्षीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक कुमान मीना यांनी केलेल्या या मोठया कारवाईमुळे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. तसेच उर्वरीत ३९ ग्रामपंचातीचे तत्कालिन सरपंचासह ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close