You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरीसंपादकीय

दिनवेध

१७२१ : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा जन्म.
 १९१४ : थोर समाजसेवक बाबा आमटे यांचा जन्मदिन.
२०१२ : महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुचवण्यासाठी नवृत्त महिला न्यायाधीशांच्या एकस्तरीय चौकशी आयोग स्थापनेचा निर्णय.
२०१३ : डॉ. सुधीर प्रभू, अनिता बेनिंजर-गोखले, विनोद बोधनकर आणि ललित राठी यांना पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर. 
२०१५ : प्रख्यात अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन.

फोकस.. थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुर्शूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आर्शम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.गांधीजींच्या सेवाग्राम आर्शमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्‍वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडोअभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपयर्ंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close