गुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगराजकिय

मणिपूर पिडीतांच्या न्यायासाठी समनक जनता पार्टीचा धिक्कार मोर्चा!

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

वाशीम : ( दि. 25 जुलै )
लाज गेली, लाज गेली, भारत सरकारची लाज गेली, चौकीदाराने मौन पाळले, भारत सरकार ची लाज गेली, मणिपूर मुख्यमंत्री गप्प बसले, भारत सरकारची लाज गेली, अश्या विविध घोषणा देत मणिपूर येथील पिडीत महिलांना तातडीने न्याय द्यावा, आणि मणिपूर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेवून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच प्रधानमंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याच्या प्रमुख मागणीसाठी समनक जनता पार्टीच्या वतीने दि. 26 रोजी शहरात धिक्कार मोर्चा निघाला. या मोर्चातुन मणिपूर येथिल नग्न धिंड व बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलांचा आक्रोश बाहेर पडला.

या धिक्कार मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धिक्कार सभा होऊन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना मागणीचे निवेदन देऊन झाला. या मोर्चाचे नेतृत्व समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीतल राठोड यांनी केले.
निवेदनानुसार, मणिपुर राज्य गेल्या दोन महिन्यांपासून पेटले आहे. तेथील दोन समुदायातील संघर्ष अधिक वाढत आहे. तीथे असणार भाजपच सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने तेथील संघर्ष अधिक वाढत आहे. खून, जाळपोळ, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूर ची राजधानी इंफाळा पासून 35 किमी अंतरावर कंगपोकपी जिल्ह्यात एका समुदायातील लोकांनी दुसऱ्या समुदायातील दोन महिलांना नग्न करुन
तेथील दोन महिलांची बलात्कार करुन नग्न धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर समजमन ढवळून निघाले. कुकी आदीवासी समाजातील दोन तरूणींना नग्न करून ज्या पद्धतीने धिंड काढण्यात आली ते बघितल्यावर प्रत्येकाची मान शरमेने खाली गेली आहे. मणिपुर मध्ये अत्याचार करणाऱ्यांना व महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन न केल्यामुळे गुन्हेगारांचं धैर्य वाढलं आहे. मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे तीथे घडणाऱ्या गुन्हयांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. त्यामुळे अत्याचारी व्यक्तींना कोणत्याही प्रकारची सूट न देता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच पिडीत आदिवासी कुटुंबांना पोलीस संरक्षण देऊन सुरक्षेची हमी द्यावी. आणि मणिपूर येथिल सरकार बरखास्त करुन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मारक येथून मोर्चास सुरवात झाली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद अमोल गोरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक मार्गे सिविल लाईन येथून मार्गक्रमण करत अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पी. एस. खंडारे, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शीतल राठोड, जिल्हा संघटक संजय वाणी, महाराष्ट्र अनिस चे प्रधान सचिव प्रा. महेश देवळे, अ. भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, रवींद्र उर्फ राजूभाऊ काळे, केशवराज काळे आदींनी भाषण केले.
मोर्चात मणिपूर येथिल घटनेच्या निषेधाचे तसेच मानवता जागरूक करणारे फलक प्रत्येक मोर्चेकऱ्यांच्या हातात होत. त्यांच्या घोषनांनी मणिपूर पिडीत महिलांचा आवाज बुलंद केला.
यामोर्चाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर राठोड, गजानन खानझोडे, रवींद्र काळे, अजय सोनुनकर, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड, सचिव निलेश राठोड, विजय राठोड, ऍड. सेवेंद्र सोनोने, भीमटायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे, नितेश जाधव, दिनकरराव बोडखे, प्रशांत शिंदे, समाधान सावंत, मीराताई राठोड, वंदना राठोड, मालती धामणे, महानंदा राठोड, प्रमिला आडे, सुनीता जाधव, वनिता पवार, सुधा जाधव, सुरेखा राठोड, प्रतिभा राठोड, लता राठोड, कुसुम सोनोने, चंद्रकला सावंत, सुनीता काळे, रेखा शर्मा, आशा अर्धापूरकर, वनिता रत्नपारखी, रेणुका राठोड, कुंता चव्हाण, कल्पना राठोड, अर्चना राठोड, शांताबाई पवार, सुनीता चव्हाण, एल डी राठोड आदींनी परिश्रम घेतले.
मोर्चात शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे