You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाशिक्षण व नोकरी

अवंती खाडेची “कुबडी ठरली दिव्यांगांचा मित्र

इन्सपायर प्रदर्शनातील भन्नाट कल्पना जाणारराष्ट्रियस्तरावर

active न्युज network

गोपाल खाडे

पारोळा:-

    राज्यस्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी वसंतराव मोरे तंत्रनिकेतन विद्यालय टेहु आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये  कारंजा लाड येथिल कंकुबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी कु.अवंती गोपाल खाडे,वर्ग ८ वा,हिने वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करित तिच्या ‘कुबडी-नव्हे दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर मांडणी केली.तिच्या या प्रतिकृतीची निवड आता राष्ट्रियस्तरावर होणार्‍या इन्सपायर प्रदर्शनासाठी झाली आहे.

अंध व अपंग हा तसा समाजतील दुर्लक्षित वर्ग.त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.ही समस्या हेरुन संवेदनशिल मनाची अवंती कळवळली आणि तयार झाली अभिनव कुबडी.ही कुबडी वैशिष्ट्यपूर्ण आहे.ती रस्त्याने चालतांना प्रकाश देणारी,चालतांना मनोरंजन करणारी,आरोग्याची काळजी घेणारी म्हणजे प्रथमोपचार पेटी उपलब्ध असलेली,तसेच कमोड शौचालय सिट व्यवस्था  असलेली,रस्त्याने जातांना मार्ग दर्शवणारी,समोर पाणी असल्याची सुचना देणारी ,चोर ओळखणारी आणि अतिशय कमी वजन असलेली अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी दिव्यांगांना उपयुक्त कुबडी अवंतीने तयार केली आहे.प्रदर्शनीला उपस्थित प्रेक्षकांनी अवंतीचे खूप कौतुक केले.तिची प्रतिकृती प्रदर्शनीच्या ठिकाणी आकर्षणाचा विषय ठरली आहे.दिव्यांगांचा एक आधार म्हणून ही कुबडी बहूमोल अशी आहे. अवंतीच्या या भन्नाट कल्पनेचे टेहू येथे खुप कौतुक झाले.

   राज्यस्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी वसंतराव मोरे तंत्रनिकेतन विद्यालय टेहु  आयोजित करण्यात आली होती.या प्रदर्शनीचा समारोप दि.१४ ला विद्यालयाच्या प्रांगणात काकासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तर मॅगेसेसे  व पद्मश्री पुरस्कार प्राप्त निलिमाताई मिश्रा यांचे हस्ते संपन्न झाला.यावेळी निलमाताईंनी संवेदनशिल मनातुन लागलेले शोध हे समाजपयोगी असतात.त्याचा समाजाला फायदा होत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

सहभागी बालसंशोधकामधुन १०%  राष्ट्रीय प्रदर्शनासाठी १९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.त्याना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवुन गौरविण्यात आले.

अवंतीला या प्रतिकृतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाश्री भडंगे,पर्यवेक्षिका मनिषा रायबागकर व विज्ञान शिक्षिका मेघा उफाडे व शुभांगी काळे यांचे मार्गदर्शन लाभले.अवंतीला तिचे वडील गोपाल खाडे आणि आई नीता खाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.अवंतीच्या या राष्ट्रियस्तराच्या निवडीबद्दल शाळेचे व्यवस्थापक संजिव रुईवाले यांचेतर्फे व सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close