You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्याफोटोमालेगावसंपादकीय

शिरपूर जैन येथे गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर :

            लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची ६९ वी जयंती शिरपूर जैन येथे दिनांक १२/१२/२०१८ रोजी सायंकाळी बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बेटर टुमारो फौंडेशन चे अध्यक्ष वामन सानप यांच्या हस्ते शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच देण्यात आला त्याचे लोकार्पण व तसेच भगवान बाबा यांच्या मंदिराचे बांधकामाकरिता शिरपूर येथील लक्ष्मण कापकर यांनी १ गुंठा जमीन दान केली त्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बेटर टुमारो फौंडेशन चे अध्यक्ष वामन सानप, प्रमुख उपस्थिती शिरपूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय गणेश मुपडे, माजी जि.प.सभापती शाम गाभणे, कलीम रेघीवाले,डॉ.गजानन ढवळे,नंदकिशोर उल्हामाले, गणेश अंभोरे,पोलीस पाटील चंद्रशेखर वानखेडे, मा.पं.स. सदस्य गजानन इरतकर,शिवाजी भंगी,मा. सरपंच गणेश भालेराव,विकास चोपडे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक निलेश शिंदे यांच्यासह जिप.शाळेचे विध्यार्थी,पत्रकार परिषदेचे अध्यक्ष कैलास भालेराव,पत्रकार गजानन देशमुख,असलम खां पठाण,गोपाल वाढे यांच्यासह गावातील प्रतीष्ठित मंडळी उपस्थित होते.  तत्पूर्वी संत भगवानबाबा,स्व.गोपीनाथजी मुंडे, यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजकांच्या वतीने वामन सानप,लक्ष्मण कापकर, पी.एस.आय गणेश मुपडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री सानप यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलतांना म्हटले कि, बहुजन समजाला शिक्षण काय हे माहित नव्हतं तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या पैशातून पुण्यामध्ये शाळा काढून सर्वांसाठी शिक्षनाची दारे खुले करून दिले. हाच आदर्श डोळ्या समोर ठेऊन,आता पर्यंत माझ्या वतीने मी जिल्ह्यातील ६२ जि.प. शाळांना संगणक संच भेट दिले, क्रांतिसूर्य महात्माफुले व मुंडे साहेबांचा आदर्श पुढे चालू ठेऊन समाजकार्य करीतच राहणार आहे.

तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रघुनाथ घ्यार,लक्ष्मण कापकर, पांडुरंग लहामगे, श्यामा लहामगे, विठ्ठल कापकर, संदीप कापकर, उमेश हंगे, रवी लहामगे, गोपाल वराडे, अनिल कापकर, हरीश लहामगे, भगवान लहामगे, शंकर हंगे, विलास हंगे, राजू गीते, वसंता हंगे, देविदास कापकर, आकाश कापकर, प्रल्हाद कापकर, संजय लहामगे, दिलीप कापकर, दगडू कापकर इत्यादींसह वंजारी समाज बांधव यांनी प्रयत्न केले.

||======*****************======+++++++$$~@!@~$$+++++++======*****************======||

                     “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ; आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close