महाराष्ट्रराजकियसंपादकीय

शिरपूर येथील भूखंड व गाळे वाटप प्रक्रिया रद्द करा

स्वराज्य कडून सीईओंकडे मागणी

0 0 6 4 4 9
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर :

शिरपूर ग्रामपंचायतने २७ भूखंड व गाळे अनधिकृतपणे वाटप केल्याप्रकरणी ०२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाला सीईओनी स्तगीतीदेण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिली. ग्रा.प.चे दप्तर जि.प.मध्ये आधीच जमा करून घेतले असून या प्रकरणी येथील स्वराज्यच्या मावळ्यांनी सदर भाडे पट्टे  रद्द करण्याची मागणी सीईओ कडे केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या ग्रामपंचायतीने २७ भूखंड व गाळे वाटप दि २६ एप्रिल २०२३ च्या मासिक सभेमध्ये ठराव घेऊन ग्रामपंचायत समोरची सर्व जागा, प्रवासी निवाऱ्याची जागा,  जनावरांच्या कोंडवाड्याची जागा व ग्राम सचिवालयातील बांधकाम करण्यात आलेले गाळे तत्कालीन व सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण इंगळे यांच्या कार्यकाळात मे २०२३ मध्ये वाटप केले होते. २४ जुलै रोजी राकॉचे जिल्हा सरचिटणीस सुशांत जाधव व माजी सरपंच गणेश भालेराव यांनी गाळे व भूखंड वाटप प्रक्रिया रद्द करण्याची सीईओ कडे याबाबत तक्रार दाखल केली होती. सीईओनी सदर प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेऊन व अवलोकन करून ०२ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणाला स्थगनादेश दिला होता. व पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत तब्बल तीन महिने गावातील कुठल्याही नागरिकांना कुठलीही माहिती न मिळण्याबाबत ग्रा.प.कडून खबरदारी घेण्यात आली होती. मात्र सदर प्रकरणाला स्तगणनादेश मिळाल्यानंतर या प्रकरणाबाबतचे सर्व पेपर सामाजिक माध्यमांवर वायरल झाले होते. लाखो रु किमतीचे भूखंड व गाळे  केवळ हजाराच्या किमतीमध्ये कसे गडप करण्यात आले हे या कागदपत्रावरून नागरिकांच्या लक्षात आले. गत काही दिवसापासून याबाबत गावामध्ये जोरदार चर्चेला उधाण आले आहे. येथील  सर्वच समाजाच्या तरुणांनी पुढाकार घेऊन तब्बल ८०० नागरिकांच्या सह्याचे निवेदन दि. ७ ऑगस्ट रोजी सीईओना दिले आहे. तसेच बस स्थानक परिसरातील लाघुव्यावसायिक सुद्धा आक्रमक झाले असून झालेले जागा भाडे पट्टे रद्ध करण्याच्या मागणी साठी आंदोलनच्या पवित्र्यात आहेत, त्या पाठोपाठ स्वराज्यच्या मावळ्यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली असून सदर बेकायदेशीर पणे झालेले जागा भाडे पट्टे रद्ध करण्याची मागणी लावून धरली आहे प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सुद्धा नमूद केले आहे.  सदर निवेदनामध्ये अनधिकृतपणे वाटप केलेले भूखंड व गाळे त्वरित रद्द करण्यात यावे व गावातील गरजू लोकांना ईश्वर चिठिच्या  माध्यमातून व जाहीर लिलावाच्या माध्यमातून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भूखंड व गाळे वाटपाचे प्रकरण आता चांगलेच तापले असून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे. सीईओ ना निवेदन देतांना स्वराज्य च्या जिल्हा भरातील मावळ्यांची उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 4 9
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे