You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रलाईफस्टाइलवाशिमशिक्षण व नोकरीसंपादकीय

‘यशवंती’ या लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण

प्रतिनिधी/शिरपूर :

active न्युज network

                        गरीबकुटुंबातील विद्यार्थ्यांच्या समस्या काय असतात? याची जाणीव असलेल्या शिरपूर जैनयेथील ‘मोटिवेशनल ट्रेनर अंकुश दि. शिंदे’ यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्वतः लघुपटाचीकथा व संवाद लिहिले आहेत. गरीब कुटुंबातील तरुणी जीवनात संघर्ष करीत डॉक्टर झाल्याचीसंघर्ष यात्रा “यशवंती” या लघु चित्रपटातून मांडण्यात आली आहे. आजच्या निराशेच्यागर्तेत अडकलेल्या तरुणांना यश मिळविण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या लघुपटाचे कथानकप्रेरणादायी आहे. पुणे येथील ‘हलते चित्र’ फिल्म कंपनी निर्मित “यशवंती” या लघुपटाचेदिग्दर्शन शिरपूर जैन येथील अंकुश महालंकर हे करीत असून जाफराबाद येथील प्रदीपपाटील घोडके हे निर्माते आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण वाशीम जिल्ह्यात झाले आहे.वाशीम शहरासह  तालुक्यातील माळेगाव येथीलस्व. काशीराम चौधरी विद्यालय परिसरात व पिंपरी ता. मंगरूळपिर येथील राऊत यांच्या शेतात व गावात चित्रीकरण करण्यात आले.

                         मोबाईल, नेट यासह विविध साधने वाढली असल्याने आजच्या तरुणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिस्थिती नसताना अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाते, अशा वेळी सत्य परिस्थिती समजून धैर्यपूर्वक वाटचाल करावी लागते “यशवंती” मध्ये अशीच ‘संघर्षगाथा’ दाखविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे चित्रपटाचे कथानक असल्याचे कथालेखक अंकुश दि. शिंदे यांनी सांगितले, छायाचित्रण प्रतिक शेजोळ प्रोडक्शन विवेक गवळी, वैभव महालंकर व सहदिग्दर्शक मनोज नांद्रेकर हे या चित्रपटाचे चित्रीकरण विविध ठिकाणी करण्यात आले आहे. एका चांगल्या सामाजिक विषयावर यशवंत चित्रपटाचे कथानक असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

या लघुपटामध्ये अभिलाषा गोळे, सायली शिंदे, गायत्री पारडे, प्रदीप घोडखे, कार्तिकी घोडके, अंकुश शिंदे, गोपाल महाळंकर, मनोज नाद्रेकर, अंजली जाधव, वैशाली खोडके हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या भेटीला चित्रपट येणार आहे

————————————————-

                     महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

News that works

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close