You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगावसंपादकीय

पैशापेक्षा पुस्तकावर प्रेम करा: रामपाल महाराज धारकर

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर : पैशापेक्षा पुस्तकावर प्रेम करणारे हेच महात्मा फुलेंचे  खरे वारसदार असणार आहेत, असे प्रतिपादन रामपाल महाराज धारकर यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थानिक सावित्री  माई फुले चौकात महात्मा फुले यांच्या स्मृती दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

परंपरेनुसार शिरपूर येथील औंढा नागनाथ मंडळाने याही वर्षी महात्मा फुले स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रामपाल महाराज धारकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम काल संपन्न झाला. स्थानिक महात्मा फुले स्मृती दिन सोहळ्याच्या विचार मंचावरून  बोलत ते म्हणाले कि,माणसाने पैशापेक्षा पुस्तकावर प्रेम करावे कारण पुस्तकावर प्रेम करणारे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,स्वामी विवेकानंद यांचे आदर्श आपल्याकडे आहेत.  आपण आता व्यसनांचा त्याग करून शिक्षणाचा, उद्योगाचा ध्यास धरला पाहिजे स्त्री-भ्रूणहत्या टाळली पाहिजे. लग्नातील खर्च टाळले पाहिजे, शहीदांचा सन्मान केला पाहिजे. असे विचार त्यांनी आपल्या विनोदी अभंगातून मांडून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सावित्री  माई फुले चौकात हा कार्यक्रम अशोकराव अंभोरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. यावेळी माजी पं.स.उपसभापती कल्पनाताई अंभोरे ,सरपंच सुनीता अंभोरे,  विजय अंभोरे, गणेश अंभोरे तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भालेराव आणि स्थानिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पीएसआय गणेश मुपडे व गिरीश तोगडवार याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते .प्रास्ताविक बंडू चोपडे यांनी केले तर सूत्रसंचालन कु.वंदना  टोंचर यांनी केले शाम दीक्षित यांनी सर्वांचे आभार मानले प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांचे परिसरात कौतुक होत आहे.

 

————————————————-

सविस्तर बातमीसाठी 👆 लिंक क्लिक करा.

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close