You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यमालेगाव

शिरपूर जैन येथे गोवर रूबेला लसीकरण मोहीमेस प्रारंभ

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर :

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा पुरस्कृत गोवर रूबेला लसीकरण मोहीमेस आज दि.२७/११/२०१८  रोजी शिरपूर येथील अरिहंत विद्यामंदीर प्राथ.शाळा शिरपूर पासून प्रारंभ करण्यात आला.

            आज दि.२७/११/२०१८ रोजी गोवर रूबेला लसीकरण मोहीमेस प्राथ.आरोग्य केंद्र शिरपूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ करवते यांच्या मार्गदर्शनात या मोहीमेस सुरूवात करण्यात आली.स्थानिक  अरिहंत विद्यामंदीर प्राथ.शाळा शिरपूर येथे या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पं.स.सदस्या शिल्पाताई देशमुख ,वैद्यकीय अधिकारी डॉ.करवते साहेब,आरोग्य निरिक्षक ए.एस.झळके, आणि क्षितीज लांडगे,संस्थाध्यक्ष संदीप भुरे,उपाध्यक्षा सरस्वती बांदे  आणि नंदू मुखमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळेतील ९०% विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.या मोहीमेसाठी पर्यवेक्षक वाय.के.शिंदे यांच्या नेतृत्वात २ चमू तयार करण्यात आल्या यामध्ये आरोग्य निरिक्षक ए.एस.झळके व क्षितीज लांडगे यांच्या अंतर्गत आरोग्य सेविका माळेकर , बोबटे ,गाडे आणि घोडके यांनी लसी करणाचे काम पाहीले.यावेळी आशावर्कर यांनी सुध्दा लसीकरणाच्या कामकाजात मदत केली.या मोहीमेदरम्यान लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावून प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.सदर लसीकरण मोहीमेदरम्यान शालेय आरोग्य अधिकारी डॉ.आशिष जाधव आणि  मालेगाव प.स. चे विषय साधनव्यक्ती शेषराव वानखेडे यांनी भेट देऊन लसीकरण मोहीमेचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किशोर जाधव,नोडल अधिकारी दिलीप तागड,बंडू चोपडे,सोनाली पंचवाटकर दिप्ती कान्हेड, तेजस बांदे,राहूल बोबडे,संदीप सोमटकर,दिनेश गाडे,विशाल मानवतकर,विकास देशमुख , संदीप लोखंडे,रूपाली दायमा,छायाताई बोरुडे सर्व शिक्षकवृंदानी व्यवस्थापन केले.यावेळी  पालक बांधवानी सुध्दा अतिशय मोलाचे सहकार्य केले.

————————————————-

सविस्तर बातमीसाठी 👆 लिंक क्लिक करा.

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close