You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाक्राईम

पत्रकाराला धमकावणे आले अंगलट ; कारंजा तालुक्यात पहिला गुन्हा दाखल

पत्रकाराला धमकी देणे आरोपीला भोवले, कारवाईसाठी पत्रकार मंचाचा पाठपुरावा

active न्युज network

कारंजा (लाड):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जातो. समाजातील विविध चांगल्या व वाईट घटना व घडामोडी समाजासमोर आणण्याचे कार्य पत्रकार करीत असतो. हे कार्य करतांना अनेकदा त्याच्यावर प्राणघातक हल्ले झाल्याच्या देखील  काही घटना घडल्या आहेत. यामुळे, पत्रकारांनी संघटीत होऊन पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी लावून धरली आहे. कारंजा तालुक्यात पत्रकार धमकी प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्याने आरोपीला पत्रकाराला धमकी देणे चांगलेच भोवुन अंगलटी आले आहे. यासाठी, कारंजा तालुका पत्रकार मंचाने पाठपुरावा केला असून गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या अमंलबजावणीसाठी निवेदनही दिले आहे. अधिक माहितीनुसार कारंजा येथील साप्ताहिक महादल चे संपादक आरिफ पोपटे यांना अकोला येथील बांधकाम व्यावसायिक सय्यद जाकीर सय्यद इब्राहीम यांनी फोनवर अश्लिल भोषत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीची आॅडिओ क्लिप सुध्दा पोपटे यांच्याकडे आहे. या संदर्भात कारंजा पत्रकार मंचाच्या वतीने कारंजा येथील शासकीय विश्रामगृहात ९नोव्हेंबर रोजी बैठक घेवुन सदर प्रकरणी पोलीसात तक्रार  दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आरिफ पोपटे यांनी सय्यद जाकीर सय्यद इब्राहीम यांच्याविरूध्द ९ नोंव्हेंबर रोजी पोलीसात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलीसांनी सय्यद जाकीर सय्यद इब्राहीम याच्या विरूध्द भादंविच्या कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास ठाणेदार एम. एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर पोलीस करीत आहे. पत्रकाराला धमकी प्रकरणी दाखल झालेला कारंजा तालुक्यातील हा पहिला गुन्हा असून, पत्रकार संघटनेच्या एकतेचा विजय असल्याचे बोलल्या जात आहे. तक्रार दाखल करतेवेळी कारंजा तालुका पत्रकार मंचाचे समन्वयक गोपाल भोयर, आरिफ पोपटे, सुनील फुलारी, सुधीर देशपांडे, अभय खेडकर, सुरज फुलमाळी, विजय भड, फिरोज शेकुवाले, हमीद शेख, विजय काळे, दीपक पवार, महेन्द्र गुप्ता, प्रफुल बानगावकर, श्याम सवाई, योगेश यादव, अंकुश कडु, पवन कदम, समीर देशपांडे, किरण क्षार, विलास खपली, लाहोटी, हेमंत पापळे, एकनाथ पवार,   यांच्यासह कारंजा तालुक्यातील पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

————————————————-

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी  दिलेल्या लिंक वर क्लिक करा.  

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ➡ Active न्युज चँनलसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामिण भागात रिपोटर्र प्रतीनिधी मानधन तत्वावर नियुक्ती करणे आहे. हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत.

इच्छुकांनी खालील क्रमांका वर संपर्क साधावा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

 Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App —  https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close