You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
रिसोड

पुष्पादेवी पाटिल महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

active न्युज network

प्रतिनिधी /रिसोड

स्थानीक स्व. पुष्पादेवी पाटिल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एकता शपथ घेऊन दिनांक 31 आक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.  आपल्या देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता अबाधित ठेऊन देशाच्या प्रती आपली निष्टा अधिक मजबुत करण्यास उत्तेजन मिळण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांची  जयंती दिन दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन संपुर्ण देशभर साजरा करण्यात येते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी देव्हडे यांनी प्रतीमेचे पुजन करुन त्यांच्या जिवनाविषयी अनमोल माहीती दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वतंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या एकसंघीकरणासाठी मोलाचे योगदान देत कणखर बाण्याने प्रत्येक गोष्टिला सामोरे जानारा लोहपुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. भारतातील संस्थानांचे विलीनीकरण करवुन घेणे व गोवा मुक्ती हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. त्याचबरोबर त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य भारत मातेच्या कल्याणासाठीच अर्पन केले. यावेळे रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण शेळके व सह कार्यक्रम आधिकारी डॉ. नंदकिशोर मोरे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.

 

——————————————

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा  active news app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close