दलीतांसाठी खासदारकी सोडणाऱ्या बहेन मायावती श्रेष्ठ – मनवर बसपाची तालुका कार्यकारीणी जाहीर
active न्युज network
मानोरा:- दंगल घडवून नेता होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र दंगलीने व्यथीत होवून मानवहितासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणे हा विचार फक्त बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहेन कुमारी मायावतीच करू शकतात त्यामुळे त्याच श्रेष्ठ नेत्या ठरतात असे प्रतिपादन बसपाचे जिल्हा प्रभारी राहुलदेव मनवर यांनी येथील विश्रामगृहात आयोजीत बैठकीस संबोधीत करतांना केले.
बैठकीचे अध्यक्षस्थानी बहुजन समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधे हे होते. तर जिल्हा उपाध्यक्ष मोहन खिराडे, कारंजा-मानोरा विधानसभा प्रभारी नंदू इंगोले, अध्यक्ष देवानंद वानखडे यांची उपस्थीती होती. पुढे बोलतांना मनवर म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक पक्ष व नेत्यांच्या उदयाची पर्श्वभूमी ही दंगली घडण्याच्या घटनांवर आधारीत आहे. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे मिरवणूक काढण्याच्या कारणाने दंगल घडून मागासवर्गीय समाजावर अत्याचार करण्यात आला होता. याबाबतीत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या राज्यसभा सदस्य बहेन कुमारी मायावती यांना संसदेत बोलू दिले नाही म्हणून त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. यासह ईतर अनेक कारणाने तुमची आमची बहीन मायावती ह्याच बहुजनांच्या खऱ्या नेत्या आहेत असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुजन समाज पक्ष सुद्धा अन्यायाविरोधात ठोस भुमीका घेऊन शेतकरी व बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे त्यामुळे अल्पसंख्याक, बहुजन, मागासवर्गीयांनी बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन मनवर यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मोहन खिराडे, नंदू इंगोले, ज्ञानेश्वर दुधे, इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बसपाची तालुका कर्यकारीणी घोषीत करण्यात आली. त्यामधे तालुका महासचीवपदी सिद्धार्थ भगत, प्रभारीपदी अशोक पांडे, उपाध्यक्ष बळीराम इंगळे व माणीक भगत, सचीवपदी भवन राठोड, कोषाध्यक्ष नरेंद्र पवनकार, शहर अध्यक्षपदी अमोल इंगळे यांची फेरनिवड करण्यात आली. शहर उपाध्यक्ष पदी शरद कांबळे, तर इंझोरी सर्कल अध्यक्ष पदी दशरथ वरघट यांची निवड करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रभारी राहुलदेव मनवर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला बहुजन समाजातील कर्यकर्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती.
——————————————-
‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा active news app डाउनलोड करा aap लिंक पुढे दिली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech
जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.
➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934
Active न्युज for Active Person’s