You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावसंपादकीय

जगदंबा देवी संस्थान शिरपूर मध्ये महाप्रसाद वितरण व पालखी,शोभायात्रा

active न्युज network

प्रतिनिधी शिरपूर/

येथील आई भवानी जगदंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पासून  महाप्रसाद वितरणला सुरुवात करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिरपूर जैन येथील आई भवानी जगदंबा देवी संस्थान मध्ये नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थांवर मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमी नंतर २१ ऑक्टोबर रोजी संस्थांवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ शिरपूर सह परिसरातील हजारो भाविकांनी घेतला. महाप्रसादानंतर गावांमधून आई भवानी जगदंबा मातेची पालखी मिरवणूक संध्याकाळी ७ वाजता काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत परिसरातील भजनी दिंड्या सह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार. मिरवणुकीने नवरात्री उत्सवाची रात्री १० वाजेपर्यंत सांगता होईल. महाप्रसादाचे यशस्वी आयोजनासाठी प्रदीप देशमुख, काशिराव देशमुख,गजानन देशमुख, प्रवीण देशमुख संदीप देशमुख,सुखदेव झोरे मामा, प्रकाश कापकर, योगेंद्र विश्वंभर, रामदास उल्हामाले, खंडूजी खोलगाडे, किशोर भांदुर्गे, ओंकार गावंडे, श्याम चौधरी, गणेश खोटे, रितेश देशमुख, सोनू देशमुख,. सर्वेश काळे सह देवीभक्तांनी परिश्रम घेतले.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’shttps://youtu.be/o1q4xtKvzxg

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close