You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्या दिवशी समाजाला संविधानाने दिलेले हक्क समजतील त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही नेतृत्वाची गरज पडणार नाही; नारायण बागडे

ज्या दिवशी समाजाला संविधानाने दिलेले हक्क समजतील त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही नेतृत्वाची गरज पडणार नाही; नारायण बागडे

active न्युज network

नागपूर दि.18/ घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा माध्यमातून लोकशाही दिली जेणेकरून देशातील प्रत्येक व्यक्ती स्वयम स्वावलंबी होईल. आपल्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय विकास स्वतःचा करेल त्याला कोणाच्या सहाऱ्या ची गरज पडणार नाही. पंरतु आज समाज सैरावैरा कोणावरही विश्वास करण्यासाठी मागे पुढे धावत आहे.ज्या दिवशी समाज संविधानाने दिलेल्या हक्काची जानिव करून घेईल त्या दिवशी त्याला कोणत्याही नेतृत्वाची गरज पडणार नाही.असे प्रतिपादन आंबेडकरी विचार मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले, ते नागपूर येथे पत्रकार भवनाच्या सभागृहात आंबेडकरी विचार मोर्चा चा वतीने आयोजित राज्य व्यापी कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून गौतम सिंह दिल्ली, गौतम वानखेडे मुंबई,उद्धव तायडे भुसावळ, कमलाकर गायकवाड पुणे, प्रा.संध्या रायठक नांदेड, चंद्रकांत सोनवणे औरंगाबाद,देवेंद्र बागडे नागपूर,सुनिता कांबळे परभणी, समाधान पवार सोलापूर,प्रा.सुधा जनबंधू नागपूर,नामदेव निकोसे नागपूर हे होते.बागडे पुढे म्हणाले संविधानाने दिलेल्या हक्काची लढाई तुमच्या मुक्ती चा मार्ग आहे. आता कोणत्याही नेतृतवाला मोठे करण्यात वेळ घालण्या पेक्षा लोकशाहीच्या अंमलबजावणी करीता रस्त्यावर उतरून संघर्ष तेज करा. हि जबाबदारी फक्त कार्यकर्ते पार पाडु शकतात; कार्यकर्ते हेच नेते घडवतात नेते कधीच कार्यकर्ते घडवत नाही असेही ते बोलले.गौतम सिंह यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटना यांचे झालेल तुकडे हे समाजासाठी धोकादायक आहेत. त्यांनी समता सैनिक दलाला मजबूत करण्यावर जोर दिला गौतम वानखेडे मुंबई यांनी अत्यंत महत्त्वाचा विषयावर भाष्य केले ते म्हणाले बाबासाहेबांनी पाहिलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न फक्त आमच्या महिला उपासिका पुर्ण करीत आहे. बौद्धाचां संघटना सुद्धा विविध प्रकारच्या तुकड्यात अडकला आहेत त्यांचे ऐक्य करणे आवश्यक आहे.देवेंद्र बागडे यांनी तर रिपब्लिकन मताचे विभाजन म्हणजे आपल्या परिवारातले विभाजन होय आमच्या शरिराचे तुकडे झाले तरी चालतील पंरतु रिपब्लिकन मतदानाचे तुकडे होऊ देवू नका या मतदानाची शक्ती तुमच्या मुक्ती चे प्रतिक आहे.

माजी पुरातत्त्व अधिक्षक नामदेव निकोसे म्हणाले भारतात असलेल्या बौद्ध लेण्या हा जागतिक वारसा आहे त्यावर होणार अतिक्रमण म्हणजे बौद्ध धर्माच्या नाश करण्यासाठी केले गेलेले युद्ध आहे या साठी सजक राहिले पाहिजे असे बोलून दाखविले. मेळाव्याचे उदघाटक शालिक बांगर हे होते तर प्रास्ताविक भगवान शेंडे यांनी कले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी कले व आभार बाबुजी सोनटक्के यांनी मानले.

कार्यक्रम स्थळाला दिवंगत योजना हाडके यांचे नाव देण्यात आले होते. या प्रंसगी कपिल नगर बौद्ध विहार पांढरबोडी बौद्ध विहार पंचशिल नगर इसासनी बौद्ध विहारातील महिला पुरुष उपासक उपासीका तसेच धम्म सेनापती वामनराव गोडबोले यांचे पुत्र संजय गोडबोले यांच्या सत्कार करण्यात आले.मेळाव्याच्या सफलते करीता

सुभाष बढेल रोशन बारमासे सुखदेव मेश्राम प्रगती मेश्राम मनोहर इंगोले राजा शेवतकर यांनी परिश्रम घेतले.

संध्या रायठक

आंबेडकरी विचार मोर्चा

मराठवाडा प्रदेश अध्यक्ष

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close