You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामालेगावव्हीडीओ

मातंग समाज बांधवांच्या वतीने इनई माता मिरवणूक व विसर्जन संपन्न

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर:

शिरपूर जैन येथे दिनांक २० अक्टोबर २०१८ रोजी मोठ्या उत्साहात मातंग समाजाच्या वतीने इनई माता मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव व माता बघिनी उपस्थित होत्या.

शिरपूर जैन येथे पिड्यान पिड्या इनई मातेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.अविरत चालू आहे. यामध्ये दसऱ्याच्या आधीच्या दिवशी इनई मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाते. व नवदुर्गा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मूर्ती शिरपूर येथील दगडु तायडे यांच्या शेतात नेऊन ठेवण्यात येतात. सुरुवातीला फक्त देवीचे मुखवटे स्थापण केले जायचे व डोक्यावरून त्याची मिरवणूक डफड्याच्या तालावर नृत्य करीत व पोत्राजाची गाणे म्हणत साजरे केले जात असत, नंतर काळाच्या बदलाप्रमाणे मुखवट्याची जागा मूर्तीने घेतली मिरवणूक डोक्यावरून लोट गाड्यावर आली पुढे,टेम्पो, व आता ट्रकटर व आधुनिक वाद्याच्या तालावर सुरु झाली, उत्सव काळात तिन्ही दिवस पोतराजाची गाणी,देवीची गाणी, गायली जाते मोठ्या उत्साहात हा सन साजरा केला जातो. समाजाबाहेरील कुणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता दरवर्षी स्थापना केली जाते त्यामध्ये महाप्रसाद समाजबांधवांमध्ये वितरीत करण्यात येतो.यावर्षी क उत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन कांबळे हे होते तर समाजातील नामदेव कांबळे,रवी कांबळे,विठ्ठल कांबळे, संजय कांबळे,विश्वनाथ कांबळे,शाम कांबळे, आत्माराम कांबळे, भगवान कांबळे,दयाल कांबळे,अनंत ताकतोडे व इतर समाज बांधव व होतकरू तरुण नवयुवक सहभागी होते.

या उत्सवमध्ये मूर्ती हि पाण्यात विसर्जीत न करता मातीच्या मुर्त्या ह्या शेतातील झाडाखाली ठेवल्याजातात कालांतराने त्या मातीत विसर्जित होतात यामध्ये कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा किंवा पाणवठ्याचे प्रदूषण होत नाही हे विशेष उल्लेखनीय.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close