You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिमव्हीडीओ

शिरपूर येथे उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवदुर्गा विसर्जन

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर:

नऊ दिवस आदिशक्ती देवीची पूजा केल्यानंतर विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी १९ ऑक्टोबरला  मोठय़ा उत्साहात ठिकठिकाणच्या मंडळांकडून दुर्गादेवींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी दुर्गा उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी ढोलताशांच्या गजरात तसेच गुलाल व पुष्प उधळत देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले. विसर्जनाची प्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती.
हिंदू धर्माशास्त्रानुसार आदिशक्तीच्या नऊ रुपांचे नवरात्रीमध्ये मनोभावे पूजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार बुधवार १० ऑक्टोबर रोजी घरोघरी घटस्थापना तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा देवी, भवानी, जगदंबा अशा देवीच्या विविध रूपातील मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नऊ दिवस सातत्याने सकाळ-संध्याकाळ पूजा, आरती करून आदिशक्तीच्या या देवीरूपांची आराधना करण्यात आली. या दरम्यान, सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी विविध उपक्रम देखील राबविले. काही ठिकाणी गरबा कार्यक्रम घेऊन रात्री उशिरापर्यंत देवीचा जागरदेखील करण्यात आला.
आई भवानी देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रीनिमत्ताने मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी भाविकांनी मनोभावे देवीचे दर्शन घेऊन आपल्या मंगलमय जीवनाची कामना केली. यंदा जिल्ह्यातील शहरी भागात व  ग्रामीण भागात ४९० ठिकाण सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने देवींच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या सर्व सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांमध्ये नऊ दिवस धार्मिक व सामाजीक उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, दुर्गा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख तयारी करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडून सामाजीक सद्भाव बिघडू नये, यासाठी पोलिस विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणच्या देवीस्थानांना जत्रेचे स्वरूप आले होते.

नवरात्रोत्सवानिमित्ताने सगळीकडे भक्तिमय वातावरण या काळात दिसून आले. विजयादशमीच्या दिवशी देवीची विशेष आराधना करण्यात आली. अनेक ठिकाणी होम-हवन तसेच देवीचा जागरदेखील करण्यात आला, तसेच विसर्जनाच्या दिवशी म्हणजे १९ऑक्टोबरला ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला.
१९ऑक्टोबरला सकाळपासूनच देवीच्या विसर्जनाची तयारी मंडळांच्या कार्यकर्त्यां कडून करण्यात येत होती. ७ ते ८ मंडळांनी दुपारी वाजत-गाजत आणि गुलाब पुष्पांची उधळण करीत विविध टाळ मृदंगाच्या गजरात देवींच्या गाण्यांवर ठेका धरत तर ९ मंडळांनी डोल- ताशे, वाद्यांच्या तालावर नृत्य करीत मिरवणूक काढली सर्व भाविकांनी देवींच्या मूर्त्यांचे विविध ठिकाणच्या जलाशयांमध्ये विसर्जन केले. अशा प्रकारे नऊ दिवस चाललेल्या या उत्सवाची भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close