You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामालेगावसंपादकीय

यावर्षी नवदुर्गा विसर्जन मिरवणुक वेळ १० वाजेपर्यंत; ठाणेदार – सुरेश नाईकनवरे

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर:

नवदुर्गा उत्सवानिमित्त शांतता कमिटीची सभा पोलीस स्टेशन शिरपूर जैन येथे दिनांक १७ अक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आली या मध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी व याकरिता उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना दिल्या कि,  मानवी आरोग्यास हानीकारक डीजे डॉल्बी वर बंदी असल्याने त्याचा वापर कोणीही करू नये युवकांनी कायदा हातात घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्य बरबाद न करता शांततेत दुर्गा विसर्जन करावे, तसेच इतर समाजाच्या भावनांचा आदर करून सण-उत्सवाचा सर्वच दुर्गा मंडळांनी आनंद लुटावा व वेळेत विसर्जन करावे असे आवाहन ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी केले.

येथील पोलीस स्टेशन ठाण्याच्या प्रमाणात शांतता समितीची बैठक पार पडली ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांच्या नेतृत्वात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवदुर्गा ऊत्सवाच्या काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. व  सर्व नवदुर्गा मंडळांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी शहरातील सर्व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये तंटामुक्त  समिती अध्यक्ष विश्‍वनाथ भालेराव, पत्रकार असलम पठाण,शेख सुलतान, पि.एस.आय संजय शिंपणे, ठाणेदार नाईकनवरे यांची समयोचित भाषणे झाली. तर  यावेळी  ए.पी.आय शाम बन्सोडे, पी.एस.आय संजय शिंपणे, पो.का.घुगे, माजी सरपंच गणेश भालेराव, माजी पं.स.सदस्य अशोकराव देशमुख, दत्ता भांदुर्गे, पो. पा. च.ना. वानखेडे, विलास गवळी, तसेच शिरपूर येथील पत्रकार बांधव संतोष गिरडे, गजानन देशमुख, गोपाल वाढे यांची उपस्थिती होती.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close