You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइलसंपादकीय

अखेर 15 कोटींच्या विकास कामाच्या कृती आराखड्यास ग्रामसभेची मंजुरी.

अखेर 15 कोटींच्या विकास कामाच्या कृती आराखड्यास ग्रामसभेची  मंजुरी.

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर

2 ऑक्टोंबर रोजी च्या ग्रामसभेचे दिनांक 16 ऑक्‍टोबर रोजी ग्रामपंचायत च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सत्ताधारी क्रांती पॅनल चे अध्यक्ष अशोक अंभोरे हे होते. 15 कोटी रुपयाचा रखडलेला विकास आराखड्यास ग्रामसभेमध्ये ठेवून अखेर मंजुरी घेण्यात आली. त्यामुळे आता शिरपूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिरपूर हे राष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे शिरपूर शहराला अलीकडेच पर्यटनाचा ब दर्जा प्राप्त झाला आहे. मा. उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटवून शहर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. याच आदेशानुसार अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र विकास आराखडा तयार करण्यात आला नव्हता. या विकास कामा करिता शासनाने 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार 16 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभा बोलावून ग्रामसभेतून विकास कामास मंजुरी घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रिसोड फाटा ते बस स्थानक, रस्ता रुंदीकरण, दुभाजक, स्ट्रीट लाईट ,बस स्थानक ते आई भवानी रस्ता ,बस स्थानक ते जैन मंदिर पर्यंत रस्ता, पोलीस स्टेशन ते जानगीर महाराज पर्यंत रस्ता, आठवडी बाजार ते सावतामाळी पर्यंत रस्ता,तसेच बस स्थानक ते गौरखेडा पर्यंत रस्ता शिरपूर शहरातील सर्वच रस्ते विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आली आहेत. तसेच स्वच्छतागृह बांधकाम शहरातील विविध समायोजित ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे शिरपूर शहरात सर्व धर्मीयांचे देवस्थान आहेत. त्यासाठी सभागृह व सभामंडप बांधकामचा  विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ,हाय मॅक्स पोल व इतर अनेक विकास कामास आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. शहरातील अनेक शासकीय इमारतीचे सौंदर्यीकरण करणे यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच येथील अ.भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा शिरपूरच्या वतीने पत्रकार भवनाची निर्मिती करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. निवेदनास ग्रामसभेमध्ये मंजुरी घेण्यात आली. त्यानुसार पत्रकार भवन  बांधकाम विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामसभेचे अध्यक्ष अशोक अंभोरे म्हणाले की ग्रामपंचायत शिरपूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.   शिरपुर शहर पर्यटन ‘ब’ दर्जाचे ‘अ’ दर्जा मध्ये लवकरच रूपांतरित करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. ते झाल्यास “शंभर कोटी रुपयांचा” विकास निधी शिरपूर साठी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणारा काळ हा शिरपूर शहरासाठी निश्चितच विकासाच्या दृष्टीने आशादायक असणार आहे. यावेळी बीजेपी चे कलीम भाई पत्रकार असलम पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती तसेच सरपंचा सौ सुनीता अंभोरे, गणेश अंभोरे, विजय अंभोरे सह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close